मुंबई : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत जभरात कोरोनामुळे १ लाख ९२ हजार १५७ लोकांचा बळी गेला आहे. तर संपूर्ण जगात २७ लाख ४९ हजार १८४ नागरिकांना कोरोनाची लागण झली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचं सावट अधिकाधिक गडद होत चाललं आहे. त्याचप्रमाणे देशभरात ७ लाख ५७ हजार ८१० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे रूग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत.
तर भारतात कोरोनाबाधितांचा आकडा आता, २३,०७७ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या लव्ह अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे मागील २८ दिवसांमध्ये १५ जिल्ह्यांमद्ध्ये एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. मागील चोवीस तासांत जवळपास १६८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
अमेरिकेत कोरोनाच हाहाकार माजा आहे. आतापर्यंत अमेरिकेत बळींची संख्या ५० हजार २४३ वर पोहोचली आहे. तर तब्बल ८ लाख ८६ हजार ७०९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ८५ हजार ९२२ रुग्ण सुखरूप बरे झाले आहेत. तर ७ लाख ५० हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
स्पेनमध्ये २ लाख १९ हजार ७६४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये २२,५२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीत १ लाख ८९ हजार ९७३ लोकं कोरोनाबाधित असून २५,५४९ लोकांचा मृत्यू झालाय. फ्रान्समध्ये १ लाख ५८ हजार १८३ कोरोनाग्रस्त आढळले असून १७२१ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.