येमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराण : सौदी अरेबिया

सौदी अरेबियावर सोडण्यात आलेलं क्षेपणास्त्र इराणी बनावटीचं असल्याचं सौदी अरेबियाचा आरोप

Updated: Jan 6, 2018, 07:18 PM IST
येमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराण : सौदी अरेबिया title=

रियाध : सौदी अरेबियावर सोडण्यात आलेलं क्षेपणास्त्र इराणी बनावटीचं असल्याचं सौदी अरेबियाचा आरोप

सौदी अरेबियाचा इराणवर आरोप

येमेनमधल्या बंडखोरांचा सौदी अरेबियाविरुद्ध संघर्ष सुरू आहे. त्यातच त्यांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र सोडलं. त्यामुळेच येमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराणचा येमेन बंडखोराना पाठिंबा असल्याचे सिद्ध झाल्याची सौदी अरेबियाची भूमिका आहे. 

 येमेनच्या बंडखोरांनी सोडलं क्षेपणास्त्र

सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने येमेनने सोडलेलं क्षेपणास्त्र पाडलं होतं. हे क्षेपणास्त्र दाट लोकवस्तीच्या भागात सोडण्यात आलं होतं. मोठी जीवितहानी करण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने तो हाणून पाडला, असं सौदी अरेबियाच्या प्रवक्त्याने सांगितलं. 

सौदी अरेबिया आणि इराण संघर्ष

सौदी अरेबिया आणि तिच्या समर्थक देशांचा आघाडी येमेन सरकारला पाठिंबा आहे. तर इराणचा येमेनच्या बंडखोरांना पाठिंबा आहे. त्यामुळेच येमेनमधले बंडखोर आणि सौदी अरेबियात संघर्ष पेटलेला आहे.