82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही; जगातील पहिला व्यक्ती

महिला संपर्क तर लांबच राहिला पण या व्यक्तीने उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिलेली नाही. 

वनिता कांबळे | Updated: Aug 8, 2023, 07:25 PM IST
82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही; जगातील पहिला व्यक्ती title=

Ajab Gajab News : स्त्री आणि पुरुष यामुळे यामुळेच या पृथ्वीतलावर मानवाचे अस्तित्व टिकून आहे. मानवाची रचनाच अशी आहे की प्रत्येक  पुरुषाला स्त्री बद्दल आणि प्रत्येक स्त्रीला पुरुषाबद्दल आकर्षण असते. बरेच जण अविवाहित असले तरी स्त्रियांच्या संपर्कात असतात. म्हणजेच कुटुंबात राहत असतील आई - बहिण यांच्यासह ते राहतात. मात्र, एक असा व्यक्ती आहे. जो 82 वर्ष जगला पण उभ्या आयुष्यात एकही महिला पाहिली नाही. महिला कशा दिसतात हेच या व्यक्तीला माहित नाही. ग्रीसमधील हा व्यक्ती आहे. 

कोण आहे हा एकही महिला न पाहणारा व्यक्ती?

लॅडबिबलने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिहाइलो टोलोटॉस (Mihailo Tolotos) असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीचा जन्म 1856 मध्ये ग्रीसमधील हलकिडिकी येथे झाला. मिहाइलो याचा जन्म होताच त्याच्या आईचा मृत्यू झाला. यामुळे मिहाइलो अनाथ झाला. एथोस पर्वतावर असलेल्या एका मठातील भिक्षूंनी मिहाइलोला दत्तक घेतले. त्यानेच मिहाइलोचे पालनपोषण आणि पालनपोषण केले. या मठाचे नियम आणि कायदे खूप कडक होते. यामुळेच मिहाइल एकाही माहिलेच्या संपर्कात आला नाही.

एकाही महिलेला पाहिले नाही हे कस काय शक्य झाले?

मिहाइलो साधूंसह ज्या मठात राहत होता त्या मठाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. मठात महिलांचा प्रवेश निषिद्ध होता. हा अजब नियम आजही मठात कायम लागू आहे. या माठात राहणाऱ्या भिक्षूंना ब्रम्हचर्य स्विकारावे लागते. येथे राहणाऱ्या भिक्षूंना आयुष्यभर अविवाहित राहता यावे त्यांच्या ब्रम्हचार्येत कोणतीही बाधा येवू नये यासाठी मठात महिलांना प्रवेश दिला जात नाही. या मठात राहणाऱ्या भिक्षूंना बाहेरच्या जगात फिरण्याची परवानगी होती. मात्र, मिहाइलो 82 वर्षात एकदाही मठाच्या बाहेर गेला नाही. यामुळे त्याने एकही महिला पाहिली नाही. स्त्रिया कशा दिसतात. हे दखील त्याला माहित नव्हते. त्याने स्त्रियांचे छायाचित्र देखील पाहिलेले नाही. मठाच्या बाहेर जाऊन आलेल्या मिहाइलोच्या सहकाऱ्यांनी त्याला स्त्रियांचे वर्णन सांगितले होते. मात्र, त्याने कधीच प्रत्यक्षात महिला पाहिलेली नाही. मिहाइलो याने कार, विमान किंवा इतर कोणत्याच वस्तू पाहिल्या नसल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

महिला न पाहिलेला जगातील पहिला व्यक्ती

मिहाइलो याने वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिहाइलो हा महिला न पाहिलेला जगातील पहिला व्यक्ती असावा. त्याचे संपूर्ण आयुष्य हे मठातच गेले.