मेलानियाने धरला डोनाल्ड ट्रम्प यांचा हात, सुरु झाल्या चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपासून एका पॉर्न स्टारसोबत जुन्या स्कँडलमध्ये चर्चेत आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 20, 2018, 02:36 PM IST
मेलानियाने धरला डोनाल्ड ट्रम्प यांचा हात, सुरु झाल्या चर्चा title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपासून एका पॉर्न स्टारसोबत जुन्या स्कँडलमध्ये चर्चेत आहेत.

दुरावा झाला कमी

पोर्न स्टारसोबत संबंधाची ही घटना उघडकीस येताच मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चा होत्या. पण आता एक असा फोटो आला आहे. ज्यामुळे त्यांच्यातील संबंध पुन्हा चांगले झाले आहेत अशा चर्चा आहेत.

ट्रम्प यांचा धरला हात

या फोटोमध्ये मेलानिया यांनी पती डोनाल्ड ट्रम्प यांचा हात धरला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया, फ्लोरिडामधील पार्कलँडमधील शाळेत झालेल्या गोळीबारातील जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. यानंतर स्थानिक पोलिसांची देखील त्यांनी भेट घेतली. त्यानंतर एका ईवेंटमध्ये दोघे एकत्र एका सोफ्यावर बसले आणि मेलानियाने पती डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रेमाने हात धरला.

हे फोटो दूसऱ्या कारणांनी देखील व्हायरल होत आहे. लोकांनी दुसरीकडे टीका करत म्हटलं की, एकीकडे जखमींची भेट घेतली आणि दुसरीकडे एका पार्टीमध्ये भाग घेतला.