लीबियातील कारागृहातून पळालेल्या लोकांवर गोळीबार, १५ ठार

गोळीबारातून बचाव झालेल्या लोकांपैकी अधिक लोक हे इरिट्रीया, इथोपिया आणि सोमालियातील तरूण आणि तरूणी आहेत.

Updated: May 26, 2018, 04:21 PM IST
लीबियातील कारागृहातून पळालेल्या लोकांवर गोळीबार, १५ ठार title=
छायाचित्र सौजन्य: (MSF_USA/Twitter/26 May 2018)

न्यूयॉर्क: उत्तर पश्चिम लीबियाच्या गुप्त कारागृहातून पळाल्ल्या लोकांवर झालेल्या गोळीबारात १५ जण ठार झाले आहेत. कारागृहातून पळालेल्या लोकांमध्ये प्रवासी आणि शरणार्थींचा समावेश आहे. डॉक्टर्स विदाऊट बॉडर्सने शनिवारी (२६,मे) याबाबत वृत्त दिले असून, या बंदीवर मानवी तस्करी केल्याचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय तपास संघटनेने म्हटले आहे की, बुधवारी (२३,मे) रात्री ही घटना घडली. या गोळीबारातून बचावलेल्या लोकांपैकी ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे.

संघटनेने म्हटले की, स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बानी वालीद शहराकडे पाळालेल्या लोकांना पुन्हा बंदी बनविण्यासाठी बंदुकधारी लोक त्यांचा पाठलाग करत होते. तर, सुरक्षा रक्षक, रूग्णालयं आणि नगर विकास विभागाचे कर्मचारी या लोकांच्या बचावासाठी प्रयत्न करत होते. 

गोळीबारातून बचाव झालेल्या लोकांपैकी अधिक लोक हे इरिट्रीया, इथोपिया आणि सोमालियातील तरूण आणि तरूणी आहेत. हे लोक युरोपमध्ये शरणागथी पत्करण्याच्या विचारात होते