लग्न कसं जुळलं, दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, लग्न कसं झालं, याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण एका लग्नात असं काही घडलं, ते जगात कुठल्यााही लग्नात घडलं नसेल. एका लग्नामध्ये एक जबरदस्त सीन झाला. त्या घटनेनं उपस्थितांना रडावं की हसावं हेच कळेना. लग्नामध्ये एवढा मोठा ट्विस्ट येईल असं नवरा-नवरीसह कुणालाही वाटलं नव्हतं. एका नवरा-नवरीचं मंडपात लग्न होत होतं. त्यावेळी जिला सून करुन घेतलं, ती सून नव्हे तर आपली सख्खी मुलगीच असल्याचं सासूबाईंच्या लक्षात आलं.
मुलीनं हात पुढे केला, त्यावेळी तिच्या हातावर जन्मखूण होती. त्या जन्मखुणेवरुन होणा-या सासूबाईंनी ही आपलीच मुलगी असल्याचं ओळखलं. ही मुलगी २० वर्षांपूर्वी एका बाजारात हरवली होती. लग्न सुरू असतानाच सासूबाईंनी त्या मुलीला ती आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं.
मग तिच्या आई वडिलांना याबाबत विचारलं. त्यांना मोठा धक्का बसला..कारण ही मुलगी दत्तक असल्याचं त्या आईवडिलांनी आतापर्यंत कुणालाच सांगितलं नव्हतं. अखेर ही मुलगी आपल्याला रस्त्यावर २० वर्षांपूर्वी सापडली होती. मग आपण तिला मुलगी मानून वाढवल्याचं त्यांनी सांगितलं. मायलेकीची कडकडून भेट झाली.
लग्नापेक्षाही खरी आई भेटल्याचा जास्त आनंद झाला, असं या नववधूनं सांगितलं. दोघीही एकमेकींना मिठी मारुन खूप रडल्या. पण मग एक नवाच ट्विस्ट निर्माण झाला.सख्ख्या भावाशी लग्न कसं करणार. पण मग हा मुलगाही दत्तक असल्याचं सासूबाईंनी स्पष्ट केलं. त्यांनी हरवलेल्या मुलीचा बरीच वर्षं शोध घेतला... ती काही मिळाली नाही.
म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेतला. त्यामुळे या मुलाशी लग्न करण्यात काहीच अडचण नाही, हे सगळ्यांना पटलं आणि मोठ्या थाटामाटात हे लग्न झालं.आणि विशेष म्हणजे ही मुलगी लग्न करुन तिच्या सासूच्या घरी जायच्या ऐवजी तिच्या आईच्याच घरी माप ओलांडून आली. चीनच्या जियाँग्सू प्रांतातली ही या लग्नाची जबराट गोष्ट आहे.