मुंबई : सार्वजनिक शौचालयाच्या क्यूबिकलमध्ये घनिष्ठ नातेसंबंध असलेल्या जोडप्याचा व्हिडीओ बनवल्याबद्दल 36 वर्षीय व्यक्तीला सोमवारी 17 आठवड्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली. चॅनल न्यूज एशियाच्या बातमीनुसार, कुप्पुसामी कार्तिकला, लोकांच्या खासगी आयुष्यात डोकाल्याच्या गुन्ह्या अंतर्गत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना बिशन-आंग मो किओ पार्कमधील सार्वजनिक शौचालयातील आहे. जिथे कार्तिकने एका प्रेमी जोडप्याचा आंघोळ करताना आणि एका खोलीत शारीरीक संबंध करत असताना व्हिडीओ बनवला.
कार्तिकने त्याच्या फोनवरून या जोडप्याचे तीन व्हिडीओ बनवले आणि त्यांचे चार ते पाच नग्न फोटो काढले, ज्यात त्यांचा चेहराही दिसत होता.
22 वर्षीय तरुणाने नंतर पोलिसांना फोन केला आणि सांगितले की, त्याने त्या व्यक्तीला पकडले आहे, ज्याने त्याच्या प्रेयसीचे नग्न अवस्थेत फोटो घेतले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून कार्तिकला अटक करण्यात आले आणि त्याचा फोन जप्त करण्यात आला. तपासादरम्यान त्याच्या फोनमध्ये अशा प्रकारचे आणखी काही व्हिडीओ सापडले, ज्यांना जप्त करण्यात आले आहे.
सगळ्या पुराव्या सकट पकडल्यानंतर पोलिसांनी कार्तिकला बोलतं केलं, कार्तिकने नंतर आपला गुन्हा दाखल केला ज्यानंतर त्याला 17 आठवड्यासाठी तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
खरेतर आपल्या मौत्रिणाचा फोट पाहून या 22 वर्षीय तरुणाला शंका आली. तो पुन्हा काही दिवसांना त्या ठराविक वेळेत त्या शौचालयात गेला. जेव्हा त्याला हा कार्तिक पुन्हा एका कपलचा व्हिडीओ काढताना मिळाला तेव्हा त्याने पुराव्यानिशी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.