होणार सून मी इंग्लंडच्या 'रॉयल फॅमिली'ची...

ब्रिटनच्या शाही घराण्याची आणि या राजमहालाची सून होणार आहे. मेगन १५ वर्षांची असताना बकिंगहॅम पॅलेस पाहण्यासाठी आली होती. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 1, 2017, 04:25 PM IST
होणार सून मी इंग्लंडच्या 'रॉयल फॅमिली'ची... title=

बकिंगहॅम : जगातील सर्वच राजघराण्यांमध्ये, खरंखुरी रॉयल फॅमिली ही लंडनचीच राजघराण्याचीच मानली जाते. मात्र जी गोष्ट आपल्या अवाक्यात नाही, किंवा जी आपल्यासाठी फक्त चर्चेचा विषय आहे, किंवा त्याविषयी आपण स्वप्नातही विचार केलेला नाही. मात्र ती लंडनच्या रॉयल फॅमिलीची सून होणार आहे.

लहानपणीची आठवण 

लहानपणी मेगन या तरूणीने ज्या राजमहालाबाहेर उभं राहून फोटो काढले होते, तीच मेगन मार्कल आता ब्रिटनच्या शाही घराण्याची आणि या राजमहालाची सून होणार आहे. मेगन १५ वर्षांची असताना बकिंगहॅम पॅलेस पाहण्यासाठी आली होती. 

आता याच राजघराण्याची सून होणार

मेगन मार्कलने तेव्हा इतर पर्यटकांसारखंच या पॅलेसच्या बाहेर फोटो काढला होता, त्यावेळी या राजघराण्याची आपण सून होऊ, असा विचार तिने स्वप्नातही केलेला नव्हता. 

लवकरच विवाहबद्ध होणार

मेगनचा हा लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरवला जातोय. ब्रिटनचा राजकुमार हॅरीसोबत मध्यमवर्गीय घरात वाढलेली ही मुलगी लवकरच विवाहबद्ध होणार आहे.

कम्युनिकेशन्सची विद्यार्थीनी

मेगन ही लॉस एंजेलिसमधल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. पुढे अभिनयात करिअर करण्यासाठी तिनं नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. नुकतीच प्रिन्स हॅरी आणि मेगन यानं औपचारिकरित्या आपल्या नात्याची घोषणा केली आहे. 

मेगन मार्कल अभिनेत्री

सध्या मेगन अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध मालिकेत काम करत आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाह विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये मे २०१८ मध्ये पार पडणार आहे. केंजिंग्टन पॅलेसमधल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. राजघराण्याची सून झाल्यानंतर आपण मालिकेला सोडचिठ्ठी देणार असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.