भारताच्या या शेजारील देशात लॉकडाऊन, डेल्टा वेरिएंटचा धुमाकूळ

जगात पुन्हा एकदा डेल्टा वेरिएंटने वाढवली चिंता.

Updated: Aug 20, 2021, 08:14 PM IST
भारताच्या या शेजारील देशात लॉकडाऊन, डेल्टा वेरिएंटचा धुमाकूळ title=

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटभाया राजपक्षे यांनी कोरोना व्हायरसची तिसरी लाट थांबवण्यासाठी डॉक्टरांचा वाढता दबाव पाहता शुक्रवार रात्रीपासून 10 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. नॅशनल ऑपरेशन्स सेंटर फॉर कोविड प्रिव्हेन्शनने सांगितले की लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 10 वाजेपासून ते 30 ऑगस्ट रोजी सकाळी 4 पर्यंत सुरू होईल.

लष्करप्रमुख जनरल शवेंद्र सिल्वा, जे कोविड प्रिव्हेन्शन फॉर नॅशनल ऑपरेशन्स सेंटरचे प्रमुख देखील आहेत, म्हणाले की क्वारंटाईन कर्फ्यू रात्री 10 ते 30 ऑगस्ट पर्यंत राहील. यापूर्वी राजपक्षे यांनी त्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता. देश बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

श्रीलंकेत गुरुवारी कोरोना विषाणूमुळे 186 लोकांचा मृत्यू झाला. यासह, 3800 नवीन रुग्ण सापडली आहेत,  अधिकृत आकडेवारीनुसार, श्रीलंकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 6,790 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण 373,165 लोकांना संसर्ग झाला आहे,

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, राजधानी कोलंबोसह पश्चिम प्रांत सर्वात जास्त प्रभावित झाला आहे. कोलंबोमध्ये 75 टक्क्यांहून अधिक प्रकरणे वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हायरसची आहेत. जूनच्या मध्यापासून देशात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे. श्रीलंकेच्या 20 दशलक्षाहून अधिक लोकसंख्येपैकी केवळ 5 दशलक्ष लोकांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत.