Attack Video: ओपन सफारी गाडीवर सिंहणीची धाव... पर्यटकांनी अशी होती रिअॅक्शन

Viral Video : सिंहणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Nov 12, 2022, 11:23 PM IST
Attack Video: ओपन सफारी गाडीवर सिंहणीची धाव... पर्यटकांनी अशी होती रिअॅक्शन title=

Lione Attack video : जंगल सफारी करण्यासाठी अनेक जणांची इच्छा असते. जंगल सफारी करत असताना प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासन विशेष काळजी घेते. पर्यटकांना देखील याबाबत सूचना दिल्या जातात. पण काही उत्साही लोकं असतात. ज्यामुळे ते अडचणीत येतात.

प्राणी कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही. कधी कधी ते गप्पपणे निघून जातात. पण कधीकधी ते अचानक हिंसक होतात. असाच एक व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगलात सफारी करत असलेल्या लोकांवर सिंहीण हल्ला करते. पण काही लोक सिंहिणीला घाबरण्याऐवजी तिच्यावर प्रेम करू लागतात. व्हिडिओ पाहून कोणत्याही पर्यटकाचे नुकसान झाले असेल असे वाटत नाही.

18 सेकंदाचा हा व्हिडिओ 5.6 दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. लाखो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि हजारो लोकांनी शेअरही केले आहे.