सिंहाच्या आवारात शिरणं पडलं महागात, हृदयाचा ठोका चुकविणारा Video

Viral Video : तो व्यक्ती सिंहाच्या गोठ्यात शिरला अन् क्षणात जंगलाच्या राजाने तिची शिकार केली. हा भयानक आणि हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 24, 2023, 02:12 PM IST
सिंहाच्या आवारात शिरणं पडलं महागात, हृदयाचा ठोका चुकविणारा Video title=
Lion Attack Man horrifying video Viral on Internet Trending video today

Lion Attack Man Video Viral : सिंहाला जंगलाचा राजा का म्हटलं जातं हे दाखविणारा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होतो आहे. सिंहाशी पंगा घेणं हे सर्वसामान्य लोकांचं काम नाही. प्राणीसंग्रहालयमध्येही प्राण्यांची देखभाल करणारे प्रशिक्षकही सिंहापासून चार हात दूर राहतात. सिंहाच्या एका गर्जनेने आपल्याला घाम फुटतो. खरं तर अनेक प्राणी संग्रहालयात सिंहाशी मैत्री असणारे प्रशिक्षकांचे व्हिडीओ इंटरनेटवर पाहिला मिळतात. (Lion Attack Man horrifying video Viral on Internet Trending video today)

पण या शक्तिशाली सिंहाचा पारा चढला तर भल्याभल्या माणसं खरं नसतं. प्राण्यांनाही फाडून खाणारा हा प्राणी जेव्हा माणसाची शिकार करतो. हृदयाचे ठोके चुकविणारा हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो. 

तो सिंहाच्या आवारात शिरला अन् मग...

हा व्हिडीओ कुठल्या तरी प्राणी संग्रहालयाचा दिसून येतो आहे. सिंह ज्या आवारात राहतो त्या परिसराला ताऱ्याची मोठी कंपन घालण्यात आली आहे. चुकून की काय एक व्यक्ती सिंहाच्या आवारात शिरतो. त्याला अजिबात कल्पना नसेल की पुढच्या क्षणी त्याचा सोबत काय होणार. जेव्हा त्या व्यक्तीवर सिंहाची नजर पडली. तेव्हा सिंहाला पाहून तो आपल्या जीव वाचवित दाराकडे पळत सुटतो. पण सिंहाने त्या व्यक्तीवर झडप घातली आणि त्याला जबड्याने पकडून ओढत पुन्हा आत आणलं. 

या निशब्द करणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तो सिंह त्या व्यक्तीला कसा फुटबॉलसारखा फेकून देतो. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीच्या मदतीसाठी तिथे उपस्थितीत असलेले लोक आरडा ओरडा करताना दिसून येतं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Earth Reels (@earth.reel)

व्हिडीओमधील व्यक्ती जिवंत आहे की नाही, याबद्दल अद्याप काही माहिती नाही. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील earth.reel या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.