Pregnancy Tourism in Leh Ladakh : मातृत्वं प्रत्येक महिलेला परिपूर्णत्वाची जाणीवर करून देतं असं म्हणतात. एखादा जीव गर्भात वाढवून त्यानंतर त्याला या सृष्टीचक्रात जन्म देणं, त्याचं संगोपन करणं हे सर्वकाही निव्वळ अविश्वसनीय. म्हणूनच अनेकदा म्हटलं जातं, की जेव्हा कोणतीही स्त्री बाळाला (Pregnancy) जन्म देते, तेव्हा तिचा नव्यानं जन्म होत असतो. पण, सर्वच महिलांच्या आयुष्यात मातृत्त्वाचं वरदान लाभतं असं होत नाही. बदलणारा काळ, प्रत्येकाच्या शरीरात असणारं वेगळेपण आणि शरीराचेही असणारे नियम या साऱ्यातून कैकजणींना आई होण्याचं सुख अनुभवता येत नाही. पण, या निराशेवरही आशेचा एक किरण आहे जो अशा महिलांना जगण्याची एक नवी उमेद देत आहे.
ही नवी उमेद भारतालगतच एका दुर्गम भागात असणाऱ्या समुदायाकडून मिळते. तुम्हाला याविषयी माहिती आहे का? लडाखमध्ये एक असा समुदाय आहे, जिथं महिला येतात आणि परपुरुषासोबत संबंध ठेवून गर्भवती राहतात. ब्रोक्पा, (Bokpra Tribe) असं या समुदायाचं नाव. सिंधू नदीच्या खोऱ्यात लडाखमध्ये असणाऱ्या बियामा, दाह, हनु, दारचिक ही या गावांची नावं. इथे असणाऱ्या ब्रोक्पा समुदायाचे लोक आपण आर्य वंशाचे असल्याचं सांगतात.
हा समुदाय सध्याच्याच काळात सर्वांसमोर आला, ज्यावेळी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बळावर झालेल्या प्रगतीमुळं त्यांच्याबाबची माहिती संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. ब्रोक्पा समुदायातील पुरुषांसोबत (Men) राहण्यासाठी इथं येणाऱ्या महिलांमध्ये परदेशी महिलांचा आकडा मोठा आहे. सध्या या संकल्पनेकडे प्रेग्नेन्सी टुरिझम म्हणून पाहिलं जात आहे.
ब्रोक्पा समुदाय आर्य वंशाचा असल्यामुळं आपली मुलंही आर्य असावीत, त्यांच्यासारखीच चाणाक्ष आणि चतुर असावीत अशी या महिलांची कामना असते. या समाजातील माणसांचे चेहरे अतिशय वेगळे असतात. इथं जर्मनी म्हणू नका किंवा जगातील आणखी कोणता देश, महिला गरोदर राहण्यासाठी येतात ही बाब अनेकांनाच थक्क करते.
कोण आहेत ही ब्रोक्पा समुदायातील मंडळी?
प्राथमिक माहितीनुसार बाहेरील प्रांतांतून या समुदायातील लोकांनी भारतीय उपखंडात पाऊल ठेवलं. वैदिक संस्कृतीवर त्यांचा प्रचंड विश्वास असल्यामुळं त्यांच्या कृतीतूनही ही बाब झळकताना दिसते. त्यांच्या भाषेवर संस्कृतचा प्रचंड प्रभाव दिसून येतो.
लोककथा आणि पारंपरिक साहित्यावर विश्वास ठेवल्यास सातव्या शकतामध्ये पश्चिम हिमालयातून ही मंडळी गिलगिट- बाल्टिस्तानच्या प्रदेशात आली. हा भाग सध्या मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचं सांगण्यात येतं. जगाच्या पाठीवर अशा अनेक जागा आहेत, अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं काही अनपेक्षित प्रथा आणि रुढी आजही सुरुच आहेत. ज्याविषयी जेव्हाजेव्हा माहिती मिळते तेव्हातेव्हा भुवया उंचावतात.