कोरोना व्हारसचा जन्म चीनच्या लॅबमध्ये?

काय आहे यामागील सत्य

Updated: Mar 19, 2020, 07:14 AM IST
कोरोना व्हारसचा जन्म चीनच्या लॅबमध्ये?  title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (CoronaVirus) ने आतापर्यंत जगात हजारो लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरूवात ही चीनच्या वुहान शहरातून झाली. यानंतर अनेक देशात कोरोनाची लागण झाली. याचदरम्यान अशी चर्चा होती की, कोरोना व्हायरस हा चीनच्या लॅबमध्ये बनवण्यात आला. यावर काही संशोधकांनी महत्वाच्या टिपणी केल्या आहे. 

काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसची निर्मिती ही चीनच्या लॅबमध्ये झाली याचं काही प्रमाण नाही. नेचर मेडिसनमध्ये छापून आलेल्या लेखात याबाबत खुलासा केला आहे. कोरोना व्हायरसच्या जीनोम सिकुएंस डाटामधून अशी माहिती मिळते की, व्हायरसचा जन्म हा नैसर्गिक झाला आहे. 

या विषयावर शोध करणाऱ्या सक्रिप्पस रिसर्चमध्ये इम्यूनोलॉजी आणि मायक्रोबॉयलॉजीच्या प्रोफेसर क्रिसटियन एंडरसन यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसचे जीनोम सिकूएंसची तुलना केल्यानंतर आम्ही पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की, SARS-Cov-2 याचा जन्म हा नैसर्गिक झाला आहे. याला कोणत्याही लॅबमध्ये बनवलेलं नाही. 

याविषयावर क्रिसटियन एंडरसनयांच्याबरोबरच Tulane युनिर्व्हसिटीचे रॉबर्ट एफ गॅरी, सिडनी युनिर्व्हसिटीचे एडवर्ड होम्स, ईडनबर्ग यूनीर्व्हसिटीचे रॅमबोट आणि कोलंबिया युनिर्व्हसिटीचे इयान लिपकिन या संशोधनात सहभागी होते. 

संशोधकांनी कोरोना व्हायरसचा जन्म कुठून झाला हे शोधण्यासाठी शरीरातील हाडाचं अध्ययन केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार वायरस जर कोणत्या लॅबमध्ये तयार केला असता तर त्याचं जुनं मूळ हे आधीच्या कोणत्यातरी आजाराशी जोडला गेला असता. पण कोरोनाच मूळ हे अगदी नवीन आहे. एवढंच नाही यामधील मूळ हे वटवाघूळ आणि पालीशी मिळतं जुळतं आहे.