जपानमधील टॉयलेट जगात भारी! पाण्याचा असा करतात वापर

जपानी टॉयलेट विषयी वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. 

Updated: Oct 14, 2022, 05:20 PM IST
जपानमधील टॉयलेट जगात भारी! पाण्याचा असा करतात वापर title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज कोणती ना कोणती पोस्ट व्हायरल होत असते. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण ही काही इमोश्नल पोस्टनसून जपानी टॉयलेट संबंधीत एक पोस्ट आहे.  एका जपानी टॉयलेटला जोडलेल्या सिंकचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सिंकमुळे फ्लशवर हात धुता येतात आणि हात धुतलेलं घाणेरडे पाणी नंतर टॉयलेट फ्लश करण्यासाठी पुन्हा वापरले जाते. 

हेही वाचा : बाबो! चार मुलांची आई पडली प्रेमात, पतीला समजल्यावर त्याने..., प्रत्येकानं केलं कौतुक!

दरवर्षी लाखो लिटर पाण्याची बचत करण्यात यशस्वी असणाऱ्या जपानी टॉयलेटची चर्चा सुरु आहे. या टॉयलेटच्या इको फ्रेंडली डिझाईनमुळे वॉशरूममधील जागेची बचत होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कॉम्पॅक्ट वॉशरूमचा संदर्भ देत, एका ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जपान गेल्या अनेक वर्षांपासून अशा शौचालयाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून लाखो लिटर पाण्याची बचत करत आहे.

हेही वाचा : मनाचा मोठेपणा दाखवत सुपरस्टार बाप- लेकानं परत केलं कोट्यवधींचं मानधन, कारण पटण्याजोगं...

जपानच्या टॉयलेटमध्ये बसवलेल्या या कमोडचे चित्र नीट पाहिल्यास, या टॉयलेटसीवर फ्लश टँक आहे ज्याच्या वर हात धुण्याचे सिंक बसवलेले आहे. त्याला जोडलेल्या पाईपमुळे हात धुताना बाहेर पडणारे साबणाचे पाणी वाहून जाण्याऐवजी फ्लश टँकमध्ये जाते. या प्रक्रियेमुळे दररोज अनेक लिटर पाण्याची बचत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या सिंकवर असलेल्या नळातून फ्रेश पाणी येतं पण या वेगळ्या टेक्नॉलॉजीमुळे दररोज पाण्याची भरपूर बचत होते किंवा त्याचा योग्य वापर होतो.

बर्‍याच फ्लशमध्ये एक मोठं बटण आणि एक लहान बटण असतं, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तविक, आधुनिक टॉयलेटमध्ये दोन प्रकारचे लीव्हर किंवा बटणं का असतात आणि दोन्ही बटणे एक्झिट व्हॉल्व्हला जोडलेली असतात. मोठं बटण दाबल्यास सुमारे 6 लिटर पाणी बाहेर येते, तर छोटे बटण दाबल्यास 3 ते 4.5 लिटर पाणी बाहेर येते.

हेही वाचा : डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे गावंढळ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

रिपोर्ट्सनुसार, सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंगचा अवलंब केल्यास वर्षभरात सुमारे 20 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते. ड्युअल फ्लश संकल्पनेबद्दल बोलताना, ती अमेरिकन औद्योगिक डिझायनर व्हिक्टर पापानेक यांच्या मनातून आली आहे. 1976 मध्ये व्हिक्टरने आपल्या प्रसिद्ध पुस्तक 'डिझाइन फॉर द रिअल वर्ल्ड'मध्ये याचा उल्लेख केला होता.