गोल्फ खेळताना खड्यात पडले जपानचे पंतप्रधान, व्हिडिओ व्हायरल

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जपानच्या दौऱ्यावर होते त्यावेळी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत असा काही प्रकार घडला की त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 12, 2017, 05:22 PM IST
गोल्फ खेळताना खड्यात पडले जपानचे पंतप्रधान, व्हिडिओ व्हायरल title=

टोकियो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जपानच्या दौऱ्यावर होते त्यावेळी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत असा काही प्रकार घडला की त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गोल्फ खेळण्यासाठी मैदानात उतरले मात्र, त्याच दरम्यान ते अचानक जमिनीवर कोसळले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या आशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत गोल्फ खेळण्यासाठी मैदानात उतरले. पण त्याच दरम्यान असं काही झालं की त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना गोल्फ खेळणं खूप आवडतं. त्यामुळेच कदाचित जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गोल्फ खेळण्याचा निर्णय घेतला असावा.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी यावेळी सफेद रंगाचं स्वेटर परिधान केलं होतं. जपानी टीव्ही चॅनल्स चॉपर्सच्या माध्यमातून गोल्फ रेकॉर्ड करत होते. या दरम्यान शिंजो आबे यांचा तोल जातो आणि ते खाली कोसळतात.

सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, जर असा प्रकार ट्रम्प यांच्यासोबत घडला असता तर..