महत्वाची बातमी : वैज्ञानिकांनी शोधून काढले 15 नवीन ग्रह

अंतराळात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 13, 2018, 03:49 PM IST
महत्वाची बातमी : वैज्ञानिकांनी शोधून काढले 15 नवीन ग्रह title=

टोक्यो : अंतराळात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे. 

वैज्ञानिकांना आपल्या संशोधनात नवे 15 ग्रह शोधून काढले आहेत. यामधील तीन ग्रहांना सुपर अर्थ अशी नावे दिली आहेत. तसेच यातील एका ग्रहावर संशोधनात वैज्ञानिकांनी पाणी सापडलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या अगोदर झालेल्या संशोधनात देखील पाणी सापडलं आहे. तसेच मंगळ ग्रहावर देखील पाणी सापडलं आहे. 

वैज्ञानिकांनी घेतली टेलीस्कोपची मदत 

हा शोध जपानच्या टोक्यो इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी केला आहे. यामध्ये त्यांनी जगातील सर्वात सुंदर आणि महत्वाच्या टेलीस्कोपची मदत घेतली आहे. यामध्ये अमेरिकेतील नासाच्या K2 ची आणि स्पेनच्या नॉरडिक ऑप्टिकल टेलीस्कोपची मदत घेतली आहे. 

लाल ताऱ्यांभोवती फिरतात हे ग्रह 

संशोधकांच्या माहितीनुसार, शोध लावलेले नवीन 15 ग्रह हे सौरमंडळात आहेत. हे सर्व ग्रह लाल रंगाच्या ताऱ्यांभोवती फिरत आहेत. लाल तारे हे आकारात सामान्य असून ते अधिक थंड असतात. त्यामुळे संशोधकांच्या मते भविष्यात एक्सोप्लॅनेट संदर्भात आकर्षक माहिती मिळू शकते. 

तीन ग्रहांना सुपर अर्थ असे नाव 

15 ग्रहांपैकी 3 ग्रहांना सुपर अर्थ अशी नावे दिली आहे. हे ग्रह पृथ्वीपासून 200 प्रकाश वर्ष दूर स्थित आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हे तिनही ग्र पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.