हमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी चिघळलं असून, यामध्ये अमेरिकेनंही हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हमासकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 17, 2023, 11:10 AM IST
हमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी  title=
Israel Hamas War news new video of a israeli hostage goes viral

Israel Hamas War : हमासनं इस्रायलमधील अनेक निष्पापांचा बळी घेतल्यानंतर इस्रायलच्या लष्करानंही या युद्धात सहभागी होत जशास जसं उत्तर दिलं. गाझा पट्टीवर (Gaza) इस्रायलकडून एअरस्ट्राईक अर्थात हवाई हल्ले करण्यात आले. ज्यानंतर आता हमास सूडभावनेनं पेटून उठलं असून, या पॅलेस्टिनी दहशतलादी संघटनेकडून साइकोलॉजिकल वॉरफेयर अर्थात मानसिकतेवर आघात करणाऱ्या युद्धतंत्राचा वापर केला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. 

हमासचा व्हिडीओ जगभरात एका क्षणात व्हायरल... 

इस्रायलमधील म्युझिक फेस्टिव्हलमधून ज्या इस्रायली नागरिकांचं अपहरण करत त्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्यातील 21 वर्षीय मिआ शेम (Mia Shem) या तरुणीचा व्हिडीओ हमासनं समोर आणला आहे. व्हिडीओ पाहताना मिआ तिथं सुरक्षित असल्याचं लक्षात येतंय खरं. 

मुळात या व्हिडीओमध्ये मिआच्या चेहऱ्यावरील भाव आणि तिच्या एकंदर हालचाली पाहता ती नेमकी किती घाबरलेली आहे याचाच अंदाज येत आहे. इथं सर्वकाही व्यवस्थित सुरुये असा दावा करणाऱ्या या तरुणीवर व्हिडीओमध्ये दिसत असणाऱ्या दृश्यांनुसार वैद्यकिय उपचारही होत आहेत. पण, नेमकं वास्तव कसं असेल याचीच चिंता आता जागतिक स्तरावरून व्यक्त केली जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Israel Hamas War चिघळताच 'ही' महत्त्वाची व्यक्ती गाठणार इस्रायल; का पत्करला इतका मोठा धोका? 

अशा प्रकारचे व्हिडीओ दाखवून आपण ओलीस ठेवलेल्यांची काळजी घेत आहोत, त्यांचं कोणतंही नुकसान होऊ देत नाही आहोत हीच बाब हमास जगासमोर आणू इच्छित असल्याचं इथं स्पष्ट होत आहे. इस्रायली माध्यम समुह जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार हमासकडून मिआ शेमचा हा व्हिडीओ एका अरेबिक टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करण्यात आला होता. दिथं अल कासिम ब्रिगेडचा कमांडर तिच्यावर वैद्यकिय उपचार करताना दिसला. 

व्हिडीओमध्ये मिआ नेमकं काय म्हणतेय? 

'हॅलो, माझं नाव मिआ शेम. मी शोहम येथे राहते. सध्या मी गाझा पट्टीमध्ये आहे. मी सेडेरोटहून परतत होते आणि 'त्या' पार्टीमध्ये मीसुद्धा होते. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळं गाझातील एका रुग्णालयात माझ्यावर उपचार करण्यात आले. तीन तासांसाठी ही शस्त्रक्रिया चालली. इथं माझी काळजी घेतली जात असून, मला औषधंही दिली जात आहेत. इथं सर्वकाही ठीक आहे, पण मी इतकंच सांगू इच्छिते की शक्य तितकं लवकर मला माझ्या आईवडिलांकडे घेऊन जा.'

सोशल मीडियामुळं पटली मिआची ओळख 

इस्रायलमधील लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या क्षणी हल्ल्याची माहिती मिळाली ज्याचवेळी मिआच्या आईनं तिला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, समोरून काहीच उत्तर येईना. आपली मुलगी बेपत्ता असल्यासंदर्भात एक सोशल मीडिया पोस्ट त्यांनी लिहिली, पण तिचा काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. मियाच्या Aunty कडून तिचा व्हिडीओ टेलिग्रामवर दिसल्याचं सांगण्यात आलं. प्रथमत: त्यांचा यावर विश्वासच बसला नाही. तब्बल 10 दिवसांनी त्यांनी मिआला पाहिलं, ती सुखरुप असल्याचं वास्तवही त्यांना मोठा दिलासा देऊन गेलं.