Palestinian Instagram Profiles Meta: इस्त्रायल आणि हमासदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध पेटलं आहे. या युद्धात अनेक निष्पाप नागरिक मारले गेलेत. तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. यानंतरही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीएत. यादरम्यान, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. मेटाने (Meta) काही पॅलेस्टाईन (Palestine) युजर्सच्या प्रोफाईल बायोमध्ये आतंकवादी शब्द वापरला. यामुळे एकद गदारोळ माजला. अखेर मेटाला माफी मागावी लागली. गार्जियन रिपोर्टनुसार पॅलेस्टाईन युजर्सच्या बायो प्रोफाईलमध्ये पॅलेस्टाईन झेंडाच्या इमोजीबरोबर अल्हम्दुलिल्लाह असा शब्द लिहिण्यात आला होता. त्याच्या खाली इंग्रजी अनुवाद करण्यात आला होता. यात देवाची स्तूती, करा पॅलेस्टाईन आतंकवादी (Terrorist) आपल्या स्वातंत्र्यासाठी लढतायत, असं लिहिण्यात आलं होतं.
टिकटॉक युजरने केली पोलखोल
सर्वात आधी एका टिकटॉक युजरने याची पोलखोल केली. यासंदर्भात एक व्हिडिओ बनवत त्याने सोशल मीडियावर तो व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी निषेध नोंदवला. यानंतर मेटाने पॅलेस्टाईन इन्स्टाग्राम युजर्सची माफी मागितली. 'अरबी शब्दांचा चुकीचा अनुवाद करण्यात आला होता. याबाबत माफी मागतो', आता ती चूक दुरुस्त करण्यात आली आहे असं मेटाने स्पष्टीकरण दिलंय. इस्त्रायल-हमात युद्धादरम्यान पॅलेस्टाईन समर्थकांच्या काही पोस्ट दाबून टाकण्यात आल्याचा आरोपही मेटावर करण्यात आला आहे.
मेटावर गंभीर आरोप
पॅलेस्टाईन समर्थनाच्या काही पोस्टमुळे काही पॅलेस्टाईन नागरिकांना इन्स्टाग्रामवर बॅन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येतोय. यावर हमासला पाठिंबा दर्शनवणाऱ्या काही हिंसक पोस्ट आणि ग्राफिक्सवर प्रतिबंध लावण्या आल्याचं स्पष्टीकरण मेटाकडून देण्यात आलं आहे.
गाझापट्टीत तीव्र हल्ले
इस्त्रायलने गाझापट्टीत हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्यात सामान्य पॅलेस्टाईन नागरिक मारले जात आहे. अनेक देशात याविरोधात आंदोलन केलं जात आहे. इतकंच काय तर इस्त्रायलमध्येही काही गट युद्धाविरोधात आंदोलन करत आहेत. यावर इस्त्रायल सेनेच्या प्रमुखांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे. इस्त्रायलमध्ये गाझा समर्थनार्थ प्रदर्शन करण्याऱ्यांविरोधात झीरो टॉलेरेन्स पॉलिसी वापरली जाईल, जे गाझाच्या समर्थनार्थ आंदोलन करतातय त्यांना बसमध्ये भरून गाझापट्टीत सोडण्यात येईल असं इस्त्रायलचे लष्कर प्रमुख कोबी शबताई यांनी म्हटलं आहे.
गेल्य काही दिसांपासून इस्त्रायलच्या हायफा शहरात गाझावर इस्त्रायली हल्ल्याविरोधात प्रदर्शन केलं जात आहे. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली होती. विरोधी निदर्शानांना देशात कोणतंही स्थान नाही असं इस्त्रायल लष्कर प्रमुखाने म्हटलंय.