नेहमी सरळ रांगेत चालणाऱ्या मुंग्या अचानक गोल गोल का फिरू लागतात; कारण आहे भयंकर

Death Spiral Of Ant: नेहमी सरळ रांगेत चालणाऱ्या मुंग्या अचानक गोल फिरु लागतात आणि स्वतःलाच मृत्यूच्या चक्रात ढकलतात, पण असं का घडतं? जाणून घ्या 

Updated: Oct 20, 2023, 05:38 PM IST
नेहमी सरळ रांगेत चालणाऱ्या मुंग्या अचानक गोल गोल का फिरू लागतात; कारण आहे भयंकर title=
What is The Ant Death Spiral and Why Do They in marathi

Death Spiral Of Ant: नेहमी सरळ रेषेत चालणाऱ्या मुंग्या अचानक एका गोल वर्तुळात फिरु लागतात. कालांतराने या वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळात फिरणाऱ्या मुंग्यांची संख्या वाढू लागते. पण हे असे का होते, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? मुंग्यांच्या या वर्तुळाला मृत्यूचे चक्र असं म्हटलं जाते. वर्तुळात फिरत असताना अनेक मुंग्या आपला प्राण गमावतात. पण नेमके हे कशामुळं घडते हे जाणून घेऊया. 

सैनिक मुंग्या त्यांना नेत्याचे अनुसरण करायचे इतकेच त्यांना माहिती असते. त्याच्यापलीकडे त्यांना काही माहिती नसते. ऐकायला हे जरी विचित्र वाटत असेल तरीदेखील हे खरं आहे. अनेकदा या सैनिक मुंग्या गोल-गोल फिरुन इतक्या थकतात की त्यातच त्यांचा मृत्यू होतो. याला इंग्रजीत Death Spiral असं म्हणतात.

सामूहिक आत्महत्या

डेथ स्पायरल ही एक अत्यंत विचीत्र गोष्ट आहे. एका मुंगीचा पाठलाग करताना दुसरी मुंगीही या वर्तुळात फसली जाते. खरं तर सैनिक मुंग्या या आंधळ्या असतात. मात्र त्यांच्याकडे असलेल्या विशेष संप्रेरकांमुळं त्या त्यांच्या लीडरचा गंधानुसार त्यांच्या मागे चालत राहतात. जर लीडर मुंगी रस्ता भरकटली किंवा तिने ती रांग मोडली तर मागे चालणाऱ्या या मुंग्यादेखील या डेथ स्पायरलमध्ये फसतात. 

सैनिक मुंगी अंध असतील तरी वासावरुन पदार्थ ओळखू शकते त्यामुळं ती अरामात फिरु शकते. मुंग्याच्या शरीरात केमिकल (फेरोमोन्स) महत्त्वाची भूमिका बजावतात. या रसायनामुळं एका मुंगीच्या मागे दुसरी मुंगी येतेय. कधी कधी दिशा भरकटल्यामुळं मागून येणाऱ्या मुंग्या या भ्रमित होतात. त्यानंतर मुंग्या एका वर्तुळात गोल गोल फिरायला सुरुवात करतात. पण हे वर्तुळ मृत्यूनेच संपते. 

अनेक वर्षांपासून पृथ्वीवर हे घडत आहे. सगळ्यात पहिले 1936 रोजी याबाबत माहिती कळाली. एक अँटबायोलॉजिस्ट संपूर्ण दिवस शेकडो मुंग्यांचा अभ्यास करत होता. तेव्हा त्याने पाहिलं की, मोठ्या संख्येने मुंग्या एका वर्तुळात फिरत आहेत. संपूर्ण एक दिवस त्या न थांबता फिरत होत्या. पाऊस पडला तरी त्या थांबल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी यातील अनेक मुंग्या मेल्या होत्या व ज्या जिवंत होत्या त्या अजूनही त्या वर्तुळात फिरत होत्या.