नवी दिल्ली : एकमात्र यहूदी देश असणारा इस्राईलने भारताप्रमाणेच युद्ध झेलले आहे. एक वेळ अशी ही होती जेव्हा अरबच्या १३ मुस्लीम देशांनी त्यांच्यावर एकत्र हल्ला केला. या युद्धात पाकिस्तान देखील सहभागी होती. इजिप्तच्या बाजुने पाकिस्तानने आपलं सैन्य पाठवलं होतं.
१९६७ मध्ये धर्माच्या आधारावर झालेल्या या युद्धात इजिप्तने १३ देशांना एकत्र घेऊन इस्राईलवर हल्ला केला होता. या युद्धात इजिप्त सोबत सीरिया, जॉर्डन, लेबनान, इराक, अल्जीरिया, कुवेत, लीबिया, मोरोक्को, सऊदी, फिलिस्तीनी जिहादी, सूडान आणि ट्यूनेशिया देखील सहभागी होते. या देशांच्या तुलनेत इस्राईलकडे खूपच कमी सैन्य होतं.
इस्राईलकडे त्यावेळेस ५० हजार सैनिक, ८०० टँक आणि ३०० विमानं होती. तर मुस्लीम देशांकडे ५ लाख ४७ हजार सैनिक, २५०४ टँक आणि ९५७ विमानं होती. हे युद्ध ६ दिवस सुरु होतं. ५ जून १९६७ ते १० जून १९६७ पर्यंत हे युद्ध चाललं. मात्र ६ दिवसात एकट्या इस्राईलने सर्व मुस्लीम देशांना पाणी पाजलं.
युद्धात ईस्राईलचे ९८३ सैनिक शहीद झाले. ४०० टँक उद्धवस्त झाले तर ४६ विमानं उडवली गेली. ४५१७ जवान जखमी झाले. सोबतच २० नागरिक देखील ठार झाले. या युद्धामध्ये १५००० इजिप्तचे सैनिक मारले गेले. ६००० जॉर्डनचे, २५०० सीरिया, १० इराकचे सैनिक मारले गेले होते. इतर सर्व मिळून १३०० सैनिक मारले गेले होते. या मुस्लीम देशांचे ४५२ विमानं एकट्या इस्राईलने उद्धस्त केले होते.