Trump यांचं मानसिक संतुलन बिघडलं? मंत्री आणि नेत्यांच्या चर्चेमधील खुलासा

राष्ट्रपती निवडणुकीतील अपयशाचा परिणाम 

Updated: Jan 8, 2021, 10:54 AM IST
Trump यांचं मानसिक संतुलन बिघडलं? मंत्री आणि नेत्यांच्या चर्चेमधील खुलासा  title=

मुंबई : राष्ट्रपती निवडणुक हरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम (Donald Trump Mentally Unstable) झाला आहे का? असा प्रश्न विचारलं जात आहे. या आजारामुळे कॅपिटल हिल सारख्या घटनांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आपल्या समर्थकांना भडकवत आहे का? अशी देखील चर्चा होत आहे. डेली मेलच्या रिपोर्ट समोर आल्यानंतर असे प्रष्न विचारले जात आहेत. 

रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, ट्रम्प कॅबिनेटचे सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीबाबत चर्चा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प हे जसे वागत आहेत त्यावरून हा दावा केला आहे. 

मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, व्हाइट हाऊस (White House) मधील कर्मचाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उभे केले आहेत. त्यांनी अशी तक्रार केली आहे की, ट्रम्प एकट्यात काही ना काही बडबडत असतात. एवढंच नाही तर ओरडतही असतात. मात्र याबाबत कुणीही अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. 

रिपोर्टनुसार, ट्रम्प यांना निवडणुकीत आलेलं अपयश हे पचवता आलं नाही. अजूनही त्यांनी आपला पराजय स्विकारलेला नाही. एवढंच नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांनाही असं वाटतं की, त्यांनी हे अपयश स्विकारावं. 

राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प कायमच आपलं वक्तव्य बदलताना दिसले. कधी त्यांनी आपला पराजय स्विकारला तर कधी ते पुन्हा एकदा आपल्या विजयाची चर्चा करू लागले. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. तसेच कॅपिटल हिलच्या हिंसेनंतर त्यांच्या मानसिक स्थिती आणखी बिघाड झाला. या घटनेमुळे फक्त अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगभरात त्यांच्या विरोधाचं वातावरण निर्माण झालं.