चिंताजनक ! जगात कोरोनामुळे मृतांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर

देशात कोरोना रुग्णांमध्ये सध्या झपाट्याने वाढ होत आहे. 

Updated: Jul 5, 2020, 10:16 PM IST
चिंताजनक ! जगात कोरोनामुळे मृतांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर  title=

मुंबई : देश लॉकडाऊन नंतर आता अनलॉक-2 मधून जात आहे. हळूहळू सर्वकाही सुरु होत आहे. पण या सोबतच देशात कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यातच भारतीयांसाठी एक चिंतेची गोष्ट म्हणजे भारत आता कोरोनामुळे मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. 

शनिवारी देशात कोरोनाचे 24 हजार 18 रुग्ण वाढले होते. जी आतापर्यंतची एका दिवसात वाढलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या आता 6 लाख 73 हजार 900 वर पोहोचली आहे. कोरोना संक्रमणाच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर, ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. पण मृतांचा आकडा पाहिला तर भारत याबाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. रशियात कोरोना संक्रमितांची संख्या 6 लाख 74 हजाराहून अधिक आहे. भारत याबाबतही रशियापासून फार जवळ आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 19 हजार 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पेरुमध्ये कोरोना संक्रमणांची संख्या 2 लाख 99 हजारांच्या वर गेली असून येथे 10,412 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.