जगातील आळशी देशांच्या यादी भारताचा समावेश

 एखादे अंतर पार करण्यासाठी भारतीयांना पायी चालण्याचा किंवा कार ड्राइव्ह करण्याचा पर्याय दिला तर सर्वाधिक भारतीय कार चालविण्याचा पर्याय निवडतात. 

Updated: Jul 14, 2017, 08:43 PM IST
 जगातील आळशी देशांच्या यादी भारताचा समावेश  title=

नवी दिल्ली :  एखादे अंतर पार करण्यासाठी भारतीयांना पायी चालण्याचा किंवा कार ड्राइव्ह करण्याचा पर्याय दिला तर सर्वाधिक भारतीय कार चालविण्याचा पर्याय निवडतात. 

पायी चालण्यासंबंधी एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात भारताचा जगातील सर्वाधिक आळशी लोकांच्या देशांच्या यादीत समावेश करण्यात आला. ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेमध्ये आळसाच्या बाबतीत ३९ व्या क्रमांकावर भारत आहे. भारतात एका दिवसात सरासरी ४२९७ पाऊले चालतात. 

सर्वात कमी आळशी चीनी लोक

मीडिया रिपोर्टनुसार स्टँडफोर्ड विद्यापीठाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.  या सर्वेत लोकांच्या पायी चालण्याच्या सवयीवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४६ देशातील ७ लाख लोकांच्या स्मार्टफोनमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस लावण्यात आले. 

जर्नल या मासिकात आलेल्या सर्वेमध्ये समोर आले की चिनी नागरीक विशेषत: हाँगकाँगजवळचे लोक सर्वात कमी आळशी असल्याचे  समोर आले आहे. हाँगकाँगमधील एक व्यक्ती सरासरी ६८८० पाऊले चालतो. 

पायी चालण्याबाबतीत सर्वात कमी स्थिती इंडोनेशियात आहे. येथील लोक सरासरी ३५१३ पाऊलेच दिवसात चालतात. जागतिक सरासरीचा विचार केला तर एक दिवसात लोक ४९६१ पाऊले चालतात.  अमेरिकेतील एक व्यक्ती ४७७४ पाऊले चालतो. 

भारतीय महिला पुरूषांपेक्षा कमी चालतात

या यादीत टॉप देशांमध्ये हाँगकाँग, चीन, युक्रेन, जपान आहे. ते साधारण  ६ हजार पाऊले चालतात. तर सर्वात खालच्या क्रमांकावर इंडोनेशिया, साऊदी अरब यांचा क्रमांक आहे. येथील लोक ३९०० पाऊले चालतात. 

आकड्यांनुसार भारतीय महिला पुरूषांपेक्षा कमी चालतात. भारतात महिला एका दिवसात सरासरी ३६८४ पाऊले चालतात, तर पुरूष दररोज ४६०६ पाऊले चालतात.