नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ज्या प्रकारे पॅरिस करार रद्द केला त्याच प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्याआधी अमेरिकेकडून १६ हॅलिकॉप्टर खरेदी करण्याचा सौदा रद्द केला आहे.
हॅलिकॉप्टरच्या किंमतीबाबत योग्य ती सहमती न झाल्याने संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय नौसेनेसाठी १६ हॅलिकॉप्टर भारत अमेरिकेच्या सिकोरस्की एयरक्राफ्ट कंपनीकडून घेणार होते. ६५०० कोटीचा हा सौदा झाला होता. पण आता संरक्षण मंत्रालयने लष्कर क्षेत्रात ही 'मेक इन इंडिया'ला प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे संरक्षण क्षेत्रात आयात होणाऱ्या वस्तू कमी केल्या जावू शकतील आणि त्यामुळे खर्च देखील वाचेल.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या २ आठवड्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी २५ जूनला अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. जेथे त्यांची भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी होणार आहे.