पंतप्रधान इम्रान खानकडून काश्मीरच्या जनतेला भडकवण्याचे प्रयत्न

इम्रान खान यांनी ट्विटरवरून गरळ ओकली आहे.

Updated: Aug 16, 2019, 03:10 PM IST
पंतप्रधान इम्रान खानकडून काश्मीरच्या जनतेला भडकवण्याचे प्रयत्न title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या जनतेला भडकवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हिंदू वर्चस्व असलेल्या मोदी सरकारविरोधात इम्रान खान यांनी ट्विटरवरून गरळ ओकली आहे. लष्करी ताकदीचा वापर करून लष्कर आणि दहशतवाद्यांना हरवणं शक्य आहे मात्र, जेव्हा एखाद्या धर्माचे नागरिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकत्र येतात. तेव्हा त्यांच्याविरुद्ध लढणं इतकं सोपं नसतं असं ट्विट इम्रान खान यांनी केलं आहे. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकत नाही असंही इम्रान यांनी ट्विट केलं आहे.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सैरावैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कधी भारताला युद्धाची धमकी देतात तर कधी भारत केवळ काश्मीर पर्यंत थांबणार नसून तो POK मध्येही पुढे जाईल असं म्हणत भीती व्यक्त करतात.

पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र संघात गेला आहे. पण कोणत्याच मोठ्या देशांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. चीन मात्र यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राला सांगत आहे.

याआधी इम्रान खान यांनी १४ ऑगस्टला पीओकेमध्ये रॅली काढली होती. पाकिस्तान व्याप्त काश्मीरला पाकिस्तान वेगळा देश मानतो.