श्रीनगर : पाक अधिकृत काश्मीर (PoK) मध्ये पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या नापाक हरकती करताना दिसत आहे. पाकिस्तानच्या स्वतंत्र्या दिवशी १४ ऑगस्टला पंतप्रधान इम्रान खान पाक अधिकृत काश्मीरचा दौरा करणार आहेत. इम्रान खान PoK ची राजधानी मुजफ्फराबाद येथे विधानसभेला संबोधित देखील करणार आहेत. या दरम्यान पाकिस्तानने पीओकेमध्ये कट्टरतावाद्यांच्या समर्थनात रॅलीचं देखील आयोजन केलं आहे.
इम्रान खान पीओकेमध्ये रॅली काढणार आहेत. पाकिस्तान सरकार १५ ऑगस्टला काळा दिवस साजरा करणार आहे. १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये भारत विरोधी रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे. या रॅलीत बुरहान वानी आणि यासीन मलिकच्या समर्थनात घोषणा दिले जाण्याची देखील शक्यता आहे.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरला पाकिस्तान वेगळा देश मानतो. इम्रान खान सोबत अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहे. येथील नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याचं देखील कळतं आहे.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तान सरकार १४ ऑगस्टला 'कश्मीर एकता दिवस साजरा करणार आहे. यासाठी 'काश्मीर बनणार पाकिस्तान' असा नारा देखील तयार करण्यात आला आहे.