NASA On Asteroid : NASA शास्त्रज्ञांनी केलेल्या एका दाव्यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. एक लघुग्रह ( Asteroid) नुकताच पृथ्वीजवळून गेला. त्याचे पृथ्वीपासूनचे सर्वात कमी अंतर 4.5 दशलक्ष किलोमीटरचे होते. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतरापेक्षा हे अंतर बारा पटीने अधिक आहे. या लघुग्रहाच्या भव्य आकारामुळे NASA च्या शास्त्रज्ञांचे याकडे लक्ष गेले. कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेस स्थित नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने या लघुग्रहाचे निरीक्षण केले आहे.
या लघुग्रहाची उंची न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट इमारतीच्या दुप्पट आहे. एम्पायर स्टेट इमारत वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणूनही ओळखली जाते. ही इमारत 102 माळ्यांची आहे. 2011 AG5 असे या लघुग्रहाला नाव देण्यात आले आहे. या लघुग्रहाची लांबी 1600 फूट म्हणजे सुमारे 500 मीटर (487 मीटर) आणि रुंदी 500 फूट म्हणजे 152 मीटर असल्याचा दावा नासाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी डीप स्पेस नेटवर्कच्या 70-मीटर गोल्डस्टोन सोलर सिस्टीम रडार अँटेना डिशच्या मदतीने हा विशाल लघुग्रह ओळखला आहे.
ग्रहांच्या रडारद्वारे आतापर्यंत दिसलेल्या पृथ्वीजवळील 1,040 लघुग्रहांपैकी हा सर्वात मोठा आहे. हा लघुग्रह 2011 AG5 3 फेब्रुवारी रोजी पृथ्वीपासून 17.7 लाख किलोमीटर दूर गेला आहे. या लघुग्रहाचा आकार, परिभ्रमण, पृष्ठभाग आणि बाह्यरेखा ओळखली आहे. या लघुग्रहाचा शोध 12 वर्षांपूर्वी लागला होता असा दावा जेपीएलचे शास्त्रज्ञ लेन्स बेनर यांनी केला आहे.
नासाच्या अँटेनाने या लघुग्रहाची 6 छायाचित्रे क्लिक केली आहेत. या लघु ग्रहाचा आकार आणि रंग पाहता हा कोळशासारखा दिसतो. या घलुग्रहाची फक्त एका बाजूची छायाचित्रे कॅप्चर झाली आहेत. हा लघु ग्रह दर नऊ तासांनी फिरत आहे. गोल्डस्टोन रडार निरीक्षणाच्या मदतीने, विशेषतः सूर्याभोवतीची लघुग्रहांची कक्षा ओळखली जाते. त्याचबरोबर पृथ्वीभोवती येणाऱ्या वस्तूही या अँटेनाद्वारे ओळखल्या जातात आणि त्यांचे निरीक्षण केले जाते.
लघुग्रह 2011 AG5 दर 621 दिवसांनी एकदा सूर्याभोवती फिरतो. 2040 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीशी टक्कर देणार नाही अस नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा लघुग्रह आता सुमारे दोन दशकांनंतर पृथ्वीपासून 11 लाख किलोमीटर अंतरावरून जाऊ शकतो असा दावा देखील शास्त्रज्ञांनी केला आहे. ‘नासा’ने या लघुग्रहाला ‘नियर-अर्थ ऑब्जेक्ट’च्या यादीत समाविष्ट केला आहे. या यादीत पृथ्वीच्या जवळील किंवा जवळून जाणार्या खगोलीय वस्तूंचा समावेश असतो. या लघुग्रहाचा समावेश ‘पोटॅन्शियली हेझार्डस् ऑब्जेक्ट’च्या यादीतही देखील आहे.