Antarctica Iceberg Video : अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) तुटून पडू लागला आहे. या हिमनगाचा आकार लंडन इतका मोठा आहे. हा हिमनग तुटल्याने संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण अभ्यासक आणि वैज्ञानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा हिमनग तुटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जर्मन स्पेस एजन्सीने हिमनग तुटतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणने (BAS) एक अहवाल शेअर केला आहे. अंटार्क्टिकामध्ये नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या असंख्य विवरांमुळे हिमनग तुटल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हिमनग तुटल्यानंतर येथील लँडस्केपमध्ये मोठे बदल दिसत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
हा हिमनग तुटल्याची छायाचित्रे युरोपियन युनियनच्या कोपरनिकस सेंटीनल या उपग्रहाने (Satellite) काढलेली आहेत. हा उपग्रह जमिनीवरील धुव्रीय प्रदेशांवर लक्ष ठेवतो. या उपग्रहाचे निरीक्षण संकलित करून व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
तुटलेल्या या महाकाय हिमनगाचा पूर्ण आकार 1550 किलोमीटर इतका आहे. हा हिमनग हा हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे तुटला आहे.
या हिमनगामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. हा हिमनग तुटल्याने येथील बर्फाचे स्खलन झाल्याने थेट समुद्रातील पाणीपातळी वाढू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. अप्रत्यक्षपणे पाणीपातळीत नक्की वाढ होऊ शकते. तसेच यामुळे हिमनगांचा वेग आणि बर्फाचा प्रवाह कमी होऊ शकतो. अंटार्क्टिकातील भूभाग हा पृथ्वीवरील अन्य भुभागांच्या तुलनेत वेगाने तप्त होत असल्याचा इशारा या सेंटरनं दिला आहे. अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या स्वरुपात इतके पाणी साठलेले आहे की हा बर्फ जर वितळला तर जगभरातील समुद्रामधील पाणीपातळी (Water Level) 200 फुटांपर्यंत वाढू शकते.
Ein #Eisberg so groß wie London: Vom Brunt-#Eisschelf im antarktischen Weddellmeer hat sich ein ca. 1500 qm großer Eisblock gelöst! Über viele Jahre wurde die Entwicklung von Radar-#Satelliten beobachtet. Die Animation zeigt Sentinel-1A-Aufnahmen der @esa von 2017 bis 2023. ⬇️ pic.twitter.com/KLifrGRBAp
— DLR_de (@DLR_de) January 25, 2023
अंटार्क्टिकामध्ये हिमनदीवर विस्तृत विवर आढळले आहे. या विवराला 'चॅसम-1' असे नाव देण्यात आले आहे. हे विवर आतापर्यंत अनेक वर्षे दडलेलं होता. ग्लेशियोलॉजिस्टना ऑक्टोबर 2016 मध्ये BAS हॅली संशोधन केंद्राच्या उत्तरेस सुमारे 17 किमी अंतरावर 'हॅलोवीन क्रॅक' नावाची दरी सापडली होती. पृथ्वीवरील अतिशय थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंटार्क्टिकामध्ये युरोपियन स्पेस एजन्सीचे रिसर्च स्टेशन आहे. संशोधक आणि वैज्ञानिक येथे काम करत असतात.