Play Boy च्या एक्स मॉडेलने म्हटले, ट्रम्प यांनी सेक्ससाठी देऊ केले होते पैसे

  पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनंतर आता प्लेबॉय मॅगझीनची मॉडेल असलेली कॅरन मॅकडुगल हिने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक महिने अफेअर होते, असा दावा केला आहे. इतके नाही मॅकडुगलने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ट्रम्पने तिच्यासोबत सेक्स केला आणि नंतर पैसे देण्याचा प्रयत्नही केला होता. 

Updated: Mar 28, 2018, 05:52 PM IST
Play Boy च्या एक्स मॉडेलने म्हटले, ट्रम्प यांनी सेक्ससाठी देऊ केले होते पैसे  title=

वॉशिंग्टन :  पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनंतर आता प्लेबॉय मॅगझीनची मॉडेल असलेली कॅरन मॅकडुगल हिने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक महिने अफेअर होते, असा दावा केला आहे. इतके नाही मॅकडुगलने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ट्रम्पने तिच्यासोबत सेक्स केला आणि नंतर पैसे देण्याचा प्रयत्नही केला होता. 

कॅरनने २०१६मध्ये अमेरिकेच्या एका मीडिया कंपनीशी करार केला होता. त्यात ती आपल्या जीवनातील काही गुपीतं कोणाला न सांगण्याची अट घातली होती. आता कॅरन या डीलमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. मॅकडुगलने सीएनएनला ट्रम्पसोबत झालेल्या सेक्शुअल एनकाउंटरबद्दल सांगितले की, आम्ही जेव्हा जवळ आलो तेव्हा ट्रम्पने मला पैसे देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मला समजले नाही की याचा अर्थ मी काय घेऊ. 

मॅकडुगलने पुढे सांगितले की, मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले मी तशा प्रकारची मुलगी नाही. त्यावेळी ट्रम्पने तिच्याकडे पाहिले आणि म्हटले ओह, तू खरच खूप खास आहे. मॅकडुगलने सांगितले सुरूवातील मी विचार केला की ट्रम्पशी मी पुन्हा भेटणार नाही. पण नंतर ट्रम्प आणि मी अनेक काळ एकमेकांसोबत घालवायला लागलो होतो.  फोनवरही अनेक तास बोलायचो. 

मॅकडुगलने सांगितले की त्यावेळी मी खऱ्या नात्यात होती. आमच्या दोघांच्या मनात एकच भावना होती. ट्रम्प आणि मॅकडुगल यांची भेट २००६ मध्ये झाली होती. त्यावेळी ट्रम्पची पत्नी मेलानिया हिने आपला मुलगा बॅरनला जन्म दिला होता.