माणसचं एलियन आहेत; एलन मस्क पुराव्यानिशी सिद्ध करणार

 एलन मस्क (Elon Musk)  यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. 

Updated: May 28, 2024, 07:55 PM IST
माणसचं एलियन आहेत; एलन मस्क पुराव्यानिशी सिद्ध करणार  title=

Elon Musk :  खरंच जगात एलियन्स अस्तित्वात आहेत का?  एलियन्स असतील तर ते कुठं राहतात? एलियन्स नेमके येतात तरी कुठून? एलियन खरचं याबाबत अनेक दावे केले जातात. एलियनबद्दल सगळ्यांना नेहमीच कुतूहल वाटते. एलियन्सबद्दल आपण अनेक सिनेमांमधून पाहिलं आणि कथांमधून ऐकलं असेल. त्यांच्या अस्तित्वाबाबत संशोधकांमध्येही उलट सुलट चर्चा सुरू असते. अशातच आता टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk)  यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. माणसचं एलियन आहेत असे असं एलन मस्क  यांनी म्हंटल आहे. इतकचं नाही तर पुराव्यानिशी ही गोष्ट सिद्ध करेन असं देखील एलन मस्क  यांनी म्हंटले आहे. 

जे कुणाच्याही डोक्यात नसतं असं काही तरी एलन मस्क यांच्या डोक्यात सुरु असतं. जगावेगळ्या कल्पना आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे एलन मस्क नेहमीच चर्चेत असताता. आता एलन मस्क  चर्चेत आलेत ते त्यांनी एलियनबाबत केलेल्या एका दाव्यामुळे. माणूसच एलियन असल्याचे  एलन मस्क यांनी म्हंटले आहे. 

नेमकं काय म्हणाले  एलन मस्क?

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये तंत्रज्ञानाच्या स्टार्ट-अप्ससाठी जागतिक शिखर परिषद पडली. या परिषदेत एलन मस्क सहभागी झाले होते. यावेळी  व्हिवाटेक इव्हेंटमध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत कार्यक्रमाच्या सूत्रधाराने त्यांना विचित्र प्रश्न विचारला. लोक तुम्हाला एलियन समजतात. याबाबत तुमचं काय मत आहे? असा प्रश्न एलन मस्क यांना विचारण्यात आला. यावेळी  एलन मस्क यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले. मी माणूस नाही तर एलियन आहे. मी वारंवार सांगूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मात्र, माणसचं एलियन आहेत. हे मी लवकरच पुराव्यानिशी सिद्ध करेन, याचे पुरावे मी सोशल मिडियावर शेअर करेन असं एलन मस्क यांनी म्हंटल आहे. 

माणसाची सर्व काम AI करणार

आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात AI च्या वापराबाबत देखील एलन मस्क यांनी मानवाला सावधानतेचा इशारा दिला आहे. भाविष्यात माणसाची सर्व कामं AI रोबोट करतील. नोकरीच्या ठिकाणी माणसाच्या ऐवजी रोबो आणि AI तंत्रज्ञाचा वापर केला जाईल. भविष्यात नोकरी हा माणसाचा एक छंद बनेल असा दावा देखील एलन मस्क यांनी केला आहे.  माणसाच्या मेंदूचे दोन मुख्य भाग असतात. एक Limbic सिस्टम आणि दुसरं  Cortex . Limbic सिस्टम भावना आणि विचार नियंत्रीत करतात. तर,  Cortex विचार आणि नियोजन करतात. भविष्यात AI रोबो मध्ये असे पहायला मिळेत असेही एलन मस्क म्हणाले.