'नवऱ्याशी वाद करण्यापेक्षा मेकअप करा', लॉकडाऊनच्या काळात अजब सल्ला

महिलांना दिला अजब सल्ला 

Updated: Apr 2, 2020, 04:15 PM IST
'नवऱ्याशी वाद करण्यापेक्षा मेकअप करा', लॉकडाऊनच्या काळात अजब सल्ला title=

 मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहेत. आतापर्यंत ९ लाख ३५ हजार ९६० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव जस जसा वाढत गेला तस तसा अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात २४*७ लोकांना फक्त आणि फक्त घरातच राहावं लागत आहे. अशावेळी चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे. अशावेळी एका देशाने चक्क महिलांना मेकअप करण्याचा अजब सल्ला दिला आहे. 

कोरोना व्हायरसमुळे मलेशिया सरकारने घरातून काम करणाऱ्या महिलांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच महिला आणि परिवार कल्याण मंत्रालयाने लॉकडाऊनमध्ये एक पोस्टर जाहीर केलं आहे. ज्यामध्ये घरातच महिलांनी नेहमीप्रमाणे मेकअप करून कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. सरकारच्या या सल्ल्याची जोरदार टीका होत आहे. 

आपल्याला माहितच आहे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'करण्याचा सल्ला दिलाय तर काहींना सुट्टी आहे. अशावेळी लोकं घरी असल्यामुळे महिलांची काम वाढली आहेत. सगळीजण एकत्र घरी असल्यामुळे खवय्यांची मागणी वाढत आहे. अशावेळी न रागवता १ ते १० असे मनातल्या मनात मोजा. 

तसेच शेअर केलेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये असं दाखवलं आहे की, जर पती दिवसभर काऊचवर बसून असेल तर चिडचिड करू नका. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तयार व्हा आणि नवऱ्याशी कार्टूनच्या आवाजाप्रमाणे संवाद साधा.. यामुळे तुमच्यात वाद होणार नाही. असे एक ना अनेक सल्ले मलेशिया सरकारने दिले आहेत. सध्या यामुळे सरकारवर टीका देखील होत आहे.