Tiredness in Office: आजच्या व्यस्त जीवनात अनेक वेळा आपण खूप थकतो. ऑफिसला जाणाऱ्यांना अनेकदा अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेकांना ऑफिसमध्ये काम करताना लवकर थकवा जाणवू लागतो आणि त्यांना कामात मन लागत नाही. अशा स्थितीत तुम्हाला शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्याची गरज आहे, ऑफिसमध्ये उत्साही राहण्यासाठी तुम्हाला असे काही उपाय करावे लागतील जे तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी थकवा जाणवत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही.
मॉर्निंग वॉक ही चांगली सवय आहे. सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉक करा. यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल आणि दिवसभर थकवा जाणवणार नाही. दररोज किमान 30 मिनिटे मॉर्निंग वॉक केल्याने शरीरात ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. मॉर्निंग वॉकमुळे हृदय निरोगी राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. चालण्याने रक्ताभिसरण वाढतं आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. मॉर्निंग वॉकमुळेही रक्तदाब नियंत्रणात राहतो.
झोपेला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. झोप ही आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांती देण्याची प्रक्रिया आहे. रात्रभर गाढ आणि शांत झोपेनंतर, तुम्ही स्वतःला खूप उत्साही अनुभवता. कोणत्याही कारणाने झोप पूर्ण झाली नाही तर थकवा जाणवू लागतो आणि ऑफिसमध्ये आल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये तुम्हाला उत्साही वाटण्यासाठी रात्री चांगली झोप घ्यावी.
भरपूर पाणी पिणं शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. कमी पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे लवकरच थकवा जाणवू लागतो. त्यामुळे काम करण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचाही आपल्या सवयीमध्ये समावेश करावा. पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासूनही आपला बचाव होतो.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)