महिन्याच्या अखेरीस तुम्ही देखील वर्तमानपत्र रद्दीत देता? थांबा! रोजच्या कामात 'असा' होईल वापर

How to Use Old Newspaper : रोजच्या रोज येणारे वर्तमानपत्र हे आपण एकदाच वाचतो आणि त्यानंतर त्याकडे पाहतही नाही. त्यामुळे अशात हे वर्तमानपत्राच नक्की काय करायचं अनेक लोक हे वर्तमानपत्र रद्दीत देतात. पण आजच ही सोडा आणि वर्तमानमध्ये जमवून घरातील ही काम करा.

दिक्षा पाटील | Updated: Jun 2, 2023, 05:56 PM IST
महिन्याच्या अखेरीस तुम्ही देखील वर्तमानपत्र रद्दीत देता? थांबा! रोजच्या कामात 'असा' होईल वापर title=
(Photo Credit : Social Media)

How to Use Old Newspaper : आपल्या सगळ्यांच्या घरी आजही वर्तमानपत्र येत. एकदा वर्तमानपत्र वाचलं की ते दुसऱ्या दिवशी काही कामाचं राहत नाही. जर अशात तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही हे सगळे पेपर महिन्याच्या अखेरी काय करतात. तर सगळेच उत्तर देतील की आम्ही महिन्याच्या अखेरीस ही रद्दी विकतो. हा देखील योग्य पर्याय आहे पण आपण या उरलेल्या वर्तमानपत्रापासून अनेक पद्धतीनं उपयोग करुन घेऊ शकतो. खरंतर बरेच लोक हे त्यांचे जुने झालेले हे वर्तमानपत्र त्यांच्या कॅबिनेट रॅकच्या खालच्या बाजुला अंधरतात. ज्यामुळे कपड्यांना किंवा कोणत्याही वस्तुला डाग लागणार नाही. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का न्यूज पेपर म्हणजेच वर्तमानपत्र तुमच्या आणखी बऱ्याच गोष्टीच्या कामात येऊ शकतात. जर तुम्हाला हे माहित नसेल तर चला लगेच जाणून घेऊया आपण वर्तमानपत्रापासून काय काय करू शकतो. 

फ्रिज साफ करण्यासाठी
फ्रिजमध्ये कापलेल्या भाज्या ठेवल्यानं जर त्या पडल्यातर त्याचा वेगळाच वास येऊ लागतो. अशात त्याला साफ करण्यासाठी तुम्ही वर्तमानपत्राचा वापर करु शकतात. आता ते साफ करायचं असेल तर कसं कराल? त्यासाठी एका भांड्यात 2 ग्लास पाण्यात मीठ आणि सोडा मिक्स करा. आता वर्तमान पत्राचे छोटे छोटे तुकडे करा. त्या तुकड्यांना या पाण्यानं भिजवा आणि त्याचा एक गोळा तयार करा. त्यानंतर त्याला फ्रिजच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. त्यानं फ्रिजमधली दुर्गंधी निघून जाईल. असं केल्यानं मेहनत न करता फ्रिजमधला हा वास जाईल. 

काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी
घरातल्या खिडक्या तुमचा आरसा साफ करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्याला तुम्ही न्यूज पेपरच्या मदतीनं देखील साफ करू शकतात. त्यासाठी पाण्यात थोडं विनेगर घाला आणि तोच खिडकीवर स्प्रे करा. त्यानंतर न्यूज पेपरच्या मदतीनं साफ करा. 

हेही वाचा : Pre-Wedding Photoshoot साठी कपलचं भलतंच धाडस, चक्क विषारी कोब्रा घेतला आणि...

तेलकट पदार्थांमधूम तेल कमी करण्यासाठी
तेलकट पदार्थांमध्ये खूप तेल असते. त्यामुळे त्यातून तेल काढण्यासाठी जर तुमच्याकडे टिश्यू नसेल तर तुम्ही पेपरचा देखील वापर करू शकता. त्यामुळे फक्त तळलेले पदार्थ हे न्यूज पेपरवर ठेवा. 

मायक्रोव्हेव ओव्हन साफ करा
बऱ्याचवेळा मायक्रोव्हेव ओव्हनचा दरवाजा खूप घाण होतो आणि त्यानं चिकट होतो. त्यानं तुम्ही वर्तमानपत्राच्या मदतीनं साफ करा. त्यानं मायक्रोव्हेवचा दरवाजा लगेच चमकतात. 

पालेभाज्या स्टोर करण्यासाठी
पालेभाज्या त्याचा अर्थ पुदीना, पालक, कोथिंबीर आणि अशा अनेक भाज्या खराब होऊ लागतात. त्यामुळे भाज्या या बराच काळ फ्रेश राहतात. त्याआधी तुम्ही पालेभाज्या धूवून साफ करून घ्या. त्यानंतर त्या भाज्या सुकून घ्या आणि न्यूजपेपरमध्ये ठेवा. अशा पद्धतीनं तुम्ही न्यूज पेपरचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)