Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा

trending news : जमिनीखाली दडलंय तरी काय? असा प्रश्न विचारत आपल्यापैकी अनेकांनी जमिनीलाच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न बालपण केला असेल.

Updated: Nov 5, 2022, 11:18 AM IST
Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा  title=
Historical Villa found in germany Kempten during excavation see photos

Latest Trending News: जमिनीखाली दडलंय तरी काय? असा प्रश्न विचारत आपल्यापैकी अनेकांनी जमिनीलाच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न बालपण केला असेल. कुतूहलापोटी केल्या जाणाऱ्या या कृतींची, या प्रश्नांची उकल जेव्हा होते तेव्हा मात्र हैराण व्हायला होतं. कारण समोर येणारी उत्तरंच तशी असतात. सध्या (germany) जर्मनीतील बवेरिया कँम्पटन (Kempten) हा परिसर अशाच एका कारणामुळं चर्चेत आला आहे. हा भाग सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. (Historical Villa found in germany Kempten during excavation see photos)

सूत्रांच्या माहितीनुसार इथं एका जुन्या वस्तीमध्ये खोदकाम सुरु असताना एक प्राचीन व्हिला सापडला आहे. हा व्हिला जर्मनीतील सर्वात जुनं घर असल्याचा दावा करण्यात आला आहे. घरामध्ये सापडेलल्या सुविधा पाहून पुरातत्त्वं खात्यालाही धक्का बसतोय. 

2 मजली बांधकाम, त्या काळात.... कसं शक्यंय? 

खोदकामातून समोर आलेला हा सांगाडा 800 चौरस फुटांमध्ये पसरला आहे. ही दोन मजली इमारत असल्याचं स्पष्ट होत आहे. जमिनीखाली असणाऱ्या या व्हिलामध्ये थर्मल बाथ आणि अंडरफ्लोअर हिटींगसारख्या सुविधा आहेत. ज्या शहरात हा व्हिला सापडला आहे त्या शहराचा इतिहास (History) रोमशी जोडला गेला असून, तो साधारण 2 वर्षे मागे नेणारा आहे. त्या काळात हे शहर Cambodunum च्या नावानं ओळखलं जात होतं. 

वाचा : बापरे! जमिनीखाली सापडलेला खजिना पाहतच राहिले लोक, 20 घरांमध्ये सापडलं....

पहिल्या शकतामध्ये जर्मनीत अशा इमारतीच नव्हत्या.... 

जर्मनीतील पुरातत्व विभागात कार्यरत असणाऱ्या जोहान्स शिसेस्ली (Johannes Schiessl)  यांच्या मते दक्षिण जर्मनीमध्ये इसवीसन  पहिल्या शतकामध्ये अशा इमारतीच अस्तित्वात नव्हत्या. रोमन वस्त्यांमध्ये तर लोक लाकुड आणि मातीनं घरं बांधत होते. 

रोमन रचनेला प्राधान्य... 

कंबोडुनम ते आता कँम्पटन म्हणून ओळखलं जातं तिथे रोमन ग्रिड प्लानचा प्रभाव दिसून येतो. ज्या काळात ते वसलं तेव्हा या शहरामध्ये अनेक सुविधा होत्या. इथूनच शहरातील बहुतांश व्यवहार चालत होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे तेच ठिकाण होतं जिथून रोमन संस्कृतीची सुरुवात झाली होती. इथूनच शहरी जीवनाची पहाट झाली होती. सध्याच्या घडीला जमिनीखाली सापडलेल्या या खजिन्यानंतर आता आर्किटेक्ट्सची टीम सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.