Hippo ने 2 वर्षांच्या मुलाला गिळलं, पण नंतर असं काही घडल की पुन्हा बाहेर फेकलं!

फिल्मी वाटावा असाच एका प्रत्यक्ष घटनेचा थरारक अनुभव एका व्यक्तीला आला आहे.

Updated: Dec 16, 2022, 05:21 PM IST
Hippo ने 2 वर्षांच्या मुलाला गिळलं, पण नंतर असं काही घडल की पुन्हा बाहेर फेकलं! title=

Hippo Swallows Two Year Old Boy : पाण्यातून प्रवास करणं जितका आनंददायी आहे तितकाच धोकादायक आहे. शांत पाण्यात बरेच खतरनाक प्राणीही असतात जे कधी डाव साधतील सांगू शकत नाही. अशा बऱ्याच हॉलिवूड फिल्मही तुम्ही पाहिल्या असतील ज्यामध्ये कलाकार जंगलामध्ये नदीच्या किनारी असतात आणि त्यावेळीच पाण्यातील काही भयंकर प्राण्यांचा सामना करावा लागतो. फिल्मी वाटावा असाच एका प्रत्यक्ष घटनेचा थरारक अनुभव एका व्यक्तीला आला आहे. आफ्रिकन देश युगांडामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका पाणघोड्यानं दोन वर्षांच्या मुलाला जिवंत गिळले. त्यानंतर पाणघोड्यानं मुलाला त्याच्या तोंडातून परत बाहेर काढल्याचे त्यात दिसत आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पाणघोड्याच्या तोंडात जाऊनही मूल सुखरूप परतले. हा मुल तलावाच्या कडेला खेळत असताना ही घटना घडली. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, दोन वर्षांचा पॉल इगा युगांडातील एडवर्ड नदीच्या किनाऱ्यावर खेळत होता. (Trending News)

एडवर्ड नदीच्या किनाऱ्यावर खेळत असताना तेथे अचानक एक पाणघोडा पाण्यातून बाहेर येतो आणि तोडांनं एडवर्डला पकडतो. त्यानंतर तो त्या मुलाला गिळण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचं पाणघोड्याकडे लक्ष गेलं आणि त्यानं पाहिलं की त्या पाणघोड्याच्या तोंडात ते मुल आहे. लगेच ती व्यक्ती मुलाच्या मदतीसाछी पुढे गेली. त्या व्यक्तीनं पाणघोड्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. हे पाहून पाणघोडाही वैतागला होता. (Viral News)

हेही वाचा : तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते; S#* कॉमेडी चित्रपट करण्यावर Riteish Deshmukh च मोठ वक्तव्य

पाण्यात जाण्यापूर्वी पाणघोड्यानं उलटी केली आणि दोन वर्षांचा मुलगा वाचला. पण पाणघोड्याच्या पकडीमुळे तो मुलगा जखमी झाला. त्यानंतर लगेचच उपचारासाठी त्या मुलाला क्लिनिकमध्ये नेण्यात आले आणि नंतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. जखमी मुलाचे नाव पॉल असे आहे. पॉलला डिस्चार्ज देण्यापूर्वी त्याला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं. युगांडाच्या पोलिसांनी दिलेल्या एका वक्तव्यात म्हटले की 'एडवर्ड सरोवराच्या काठावर पाणघोड्यानं एका मुलाला गिळल्याची ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. तर दोन वर्षां क्रिस्पास बागोंझाच्या शौर्यामुळे मुलाचे प्राण वाचले आहेत.

डिस्कव्हर वाइल्डलाइफच्या रिपोर्टनुसार, पाणघोडा हा हत्तीनंतरचा दुसरा सर्वात मोठा प्राणी आहे. नर पाणघोडे 1,600-3,200 किलो आणि मादी पाणघोडे 650-2,350 किलो वजन असते. पाणघोडे दररोज त्यांच्या शरीराच्या वजनाच्या 1 किंवा 1.5 टक्के अन्न खातात. पाणघोडे पाण्यात पोहू शकत नाहीत, परंतु ते तळाशी असलेल्या पाण्यात राहतात. राग आला तर तो सगळ्यात जास्त धोकादायक प्राणी बनतो.