Qatar Princess: इस्लामिक देश कतार हा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तिथले कडक कायदे आणि नियम यांची जगभरात चर्चा सुरु असते. सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चेत आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेचा (Fifa World Cup 2022) एक मोठा भाग पूर्ण झाला आहे. तुम्हाला माहितच असेल की कतार आपल्या काही नागरिकांसोबतच्या क्रूरतेच्या प्रकरणामुळे देखील चर्चेत आला आहे. हल्लीच तेथील एक राजकुमारी अचानक चर्चेचा विषय ठरली आहे.
राजकुमारी कतारच्या (Qatar Princess) अल थानी शासक कुटुंबातील सदस्य आहे. जेव्हा तिने ब्रिटनमध्ये आश्रय घेतला तेव्हा तिने यूके होम ऑफिस, इमिग्रेशन आणि सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या सरकारी एजन्सीला सांगितले की, तिचे बालपण किती कठीण गेले होते. तिने पुढे सांगितले की, ती एक स्त्री म्हणून जन्माला आली आहे पण आतून ती पुरुषासारखी आहे. कतारमध्ये समलिंगी असणे हा दंडनीय गुन्हा आहे. कतारमध्ये समलैंगिकतेसाठी तीन वर्षांची शिक्षा आहे. अशा परिस्थितीत तिला तिथे सुरक्षित वाटत नाही. समलैंगिकतेच्या या कायद्यामुळे त्या राजकुमारीला घरातून पळ काढावा लागला. आणि याच कायद्यामुळे देशातील अनेक लोकांना देश सोडण्यास भाग पाडले जाते.
कतारच्या राजकुमारीच्या कागदपत्रांनुसार, 2015 च्या उन्हाळ्यात ती तिच्या कुटुंबासह लंडनला कौटुंबिक सहलीवर गेली होती, परंतु त्यादरम्यान ती तिच्या मैत्रिणीसह पळून गेली. राजकुमारीने कागदपत्रांमध्ये लिहिलं होतं, माझ्या आयुष्याचा कचरा झाल्यासारखा वाटत होते. मला माझ्या कुटुंबातील इतरांप्रमाणे माझ्या चुलत भावांशी कधीच लग्न करायचे नव्हते. पुढे माझा भाऊ काय करेल याची मला चांगलीच कल्पना होती.
कतारमध्ये समलैंगिक असणे हा गुन्हा मानला जातो. कतारमध्ये समलैंगिकतेसाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये, ह्युमन राइट्स वॉचचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यात कतारी सुरक्षा दलांनी एलजीबीटी (LGBTQ) लोकांना विनाकारण अटक करुन त्यांचे छळ करण्यात आले आहेत.