बीजिंग : चीन आणि भारत सीमेवर वादांचा कारण भारतातील हिंदू राष्ट्रवाद असल्याचे चीनच्या एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. या हिंदू राष्ट्रवादामुळे भारताचे चीनशी असलेले रणनितीचे अपहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, असेही नमूद केले आहे.
चीनचे वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादी उत्साहामुळे सीमावादावरून चीनविरूद्ध बदला घेण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी भावनांना खतपाणी मिळाले आहे.
यातील एका लेखात यू निंग म्हणाले, परराष्ट्र निती अंतर्गत भारतात परदेशी संबंध विशेषतः चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चीन आणि भारतीय सीमाभागत गेल्या महिन्याभरापासून सिक्किमच्या डोकलाममध्ये वाद सुरू आहे. हा वाद भारत, भूतान आणि चीन यांच्यातील त्रिकोणीय वाद आहे.
राष्ट्रीय शक्तीच्याबाबतीत भारत चीनपेक्षा कमकुवत आहे, असेही लेखात म्हटले आहे.