आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी देशाच्या प्रगतीसाठी देवी लक्ष्मीचा (lakshmi) आणि गणपीचा (Ganpati) फोटो भारतीय चलनावर लावण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. नव्या नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी म्हटलं आहे. मात्र केजरीवाल यांच्या या मागणीवरुन आता टीका करण्यात येत आहे. भाजपसह कॉंग्रेस नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की जगात एक असा देशही आहे ज्याची 87 टक्के लोकसंख्या मुस्लिम (Muslims) आहे, तरीही त्यांच्या 20 हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचा (Ganpati) फोटो छापलेला आहे. इंडोनेशिया (indonesia) असा देश आहे जिथे नोटांवर गणपतीचा फोटो पाहायला मिळेल. याशिवाय देशभरात अनेक ठिकाणी अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीही दिसतात.
गणपतीचा (Ganpati)फोटो का छापला?
काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची (indonesia) अर्थव्यवस्था खूपच ढासळली होती. या कारणास्तव तेथील आर्थिक तज्ज्ञांनी वीस हजारांची नवी नोट जारी करण्याची शिफारस केली होती. सरकारने वीस हजारांची नोट जारी केली तेव्हा त्यावर गणपतीचा (Ganpati) फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे आता तिथली अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
इंडोनेशियातील 20 हजारांच्या नोटेवर समोर गणपतीचा फोटो असून पाठीमागे एका वर्गाचा फोटो आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि मुले आहेत. याशिवाय या नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचेही फोटो आहे. देवांत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायकही राहिले आहेत.
या देशात नोटेवर फक्त हिंदू देवतेचा फोटोच नाही तर, अनेक ठिकाणी हनुमान, अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीदेखील पाहायला मिळतात. इंडोनेशियन आर्मीच्या मॅस्कोटमध्ये हनुमान आहे. याशिवाय एका प्रसिद्ध पर्यटनस्थळावर अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. तिथल्या फोटोंमध्ये कृष्ण आणि अर्जुन व्यतिरिक्त घटोत्कचचीही मूर्ती दिसेल.
दरम्यान, दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी पत्रकार परिषदेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा विचार केला पाहिजे, असा सल्ला दिला आहे.