Happy Propose Day 2023: गुडघ्यावर बसून का केलं जातं प्रपोज? माहीतीये का?

Propose Day Wishes 2023 : आज, 8  फेब्रुवारीला प्रपोज डे सेलिब्रेट केला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. मात्र प्रेम व्यक्त करतांना बहुतेकजण डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करतात. या मागाचं कारण तुम्हाला माहितेय का?

Updated: Feb 8, 2023, 11:58 AM IST
Happy Propose Day 2023: गुडघ्यावर बसून का केलं जातं प्रपोज? माहीतीये का? title=
Happy Propose Day 2023

Happy Propose Day: वॅलेंटाइन विकमध्ये आज म्हणजेच ८ फेब्रुवारीला प्रपोज डे (Propose Day) असतो. प्रपोज डे ला आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. चित्रपट असो किंवा खरे आयुष्य मात्र मुलगा मुलगी हे प्रेम व्यक्त करतांना गुडघ्यावर बसतात. पण गुडघ्या बसूनचं का प्रपोज केला जातो? या मागाचं कारण तुम्हाला माहितेय का? गुडघ्यावर बसूनच प्रपोज करावं अशा परंपरेचा कुठेही लिखित पुरावा मिळत नाही. पण अशा पध्दतीने प्रपोज करणं म्हणजे वचन देण्याचा संकेत समजला जातो. सन्मान देण्याचा हा प्रोटोकॉल समजला जात असे. गुडघ्यावर बसून प्रपोज करणं जोडीदाराला सन्मान देण्याचं प्रतीक असतं. माझं संपूर्ण जीवन आता तुझं आहे, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं यातून सांगितलं जाते.

आपल्या आवडी निवडी समजून घेणारी, आपल्याला आपलं माणनारी एक व्यक्ति आपल्या आयुष्यात असावी असं प्रत्येकाला वाटतं. अर्धातच ही व्यक्त आपली प्रेमीका, सखी, जोडीदारच्या रूपात आपल्या आयुष्यात येते. याच व्यक्तिला ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे सांगण्यासाठी प्रपोज डे साजरा केला जात असावा. मात्र प्रपोज करताना बहुतेकदा लोक डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करतात, कारण बहुतांश लोक राइटी असतात. त्यामुळे त्यांना रिंग घालणं सोपं जातं.य पण तसंच बसावं असा नियम आहे. मात्र गुडघ्यावर बसून प्रपोज करणे या परंपरेचा कोठेही लिखित पुरावा नाही आहे. तज्ञांच्या मते, ही प्रथा मध्ययुगीन काळापासून सुरू झाली. 

वाचा:  बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीचं का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण 

त्या काळात उच्चभ्रू महिलांसमोर योद्धे गुडघे टेकत होते. हा त्याकाळातील एक प्रोटोकॉलचा भाग असल्याचे म्हणता येईल. त्या काळातील अनेक चित्रांमध्ये शूरवीरांनी त्यांच्या राजासमोर किंवा प्रतिष्ठित व्यक्तींसमोर गुडघे टेकल्याचे दृश्य दिसत आहे. हे समोरच्या व्यक्तीला सम्मान देण्याचे प्रतीक मानले जात असे. त्याचेच अनुकरण आत्ताच्या काळात प्रपोज करताना केले जाते. गुडघ्यावर बसून प्रपोज करणे जोडीदाराप्रति असलेला सम्मान व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते.