फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला हॅकरचं मोठं चॅलेंज

...तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होणार

Updated: Sep 30, 2018, 11:39 AM IST
फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला हॅकरचं मोठं चॅलेंज title=

मुंबई : फेसबूकचा संस्‍थापक मार्क झुकरबर्गला ओपन चॅलेंज देण्यात आलं आहे. त्याचं फेसबूक अकाऊंट 30 सप्टेंबरला हॅक केल्यानंतर डिलीट करणार असल्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. झुकरबर्गला धमकी देणाऱ्या या हॅकरचं नाव चँग ची युआन असल्याचं बोललं जात आहे. हॅकरने म्हटलं आहे की, बग बाउंटी हंटरच्या माध्यमातून होणारी ही हॅकिंग लाईव्ह असणार आहे. म्हणजे सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्मवर 26 हजार फॉलोवर त्याला पाहू शकतील.. बग बाउंटी प्रोग्राम टेक्निकल कंपन्यांसाठी सामान्य गोष्ट आहे. फेसबूककडे देखील असा एक प्रोग्रॅम आहे. ज्याचा वापर कंपन्या सिस्‍टममधील कमतरता जाणून घेण्यासाठी करतात.

पहिली लाईव्ह हॅकिंग

इंडिया टुडेच्या बातमीनुसार ही जगातली पहिली अशी हॅकिंग असणार आहे जी लाईव्ह पाहता येणार आहे. तज्ज्ञांचं असं मत आहे की ही गोष्ट शक्य नाही, पण खरंच असं होतं का हे येणारा काळच सांगेल.

कोण आहे चँग ची युआन

ब्‍लूमबर्गच्या रिपोर्टनुसार चँग ची युआन हा तैवानचा राहणार आहे. याआधी त्याने अॅपल आणि टेस्‍लाचे अकाउंट देखील हॅक केले आहेत. लोकल बस ऑपरेटिंग सिस्‍टमला हॅक केल्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल आहे. तो प्रोफेशनल हॅकर नसून फक्त मस्ती म्हणून हॅकिंग करतो. झुकरबर्गला याआधी देखील हॅकिंगची धमकी मिळाली आहे.

फेसबूक हॅकिंगचे शिकार

सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकने म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वीच त्यांची साईट हॅक झाली होती. जवळपास 5 कोटी यूजर्सचा डेटा हॅक झाला होता. फेसबूक या प्रकरणाची त्यांच्याच स्तरावर चौकशी करत आहे. त्यांनी यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाऊलं देखील उचलली आहे. फेसबूकच्या मते, व्‍यू एज फीचरच्या माध्यमातून हॅकरने साईटमध्ये प्रवेश केला. यातून त्याने फेसबुक अॅक्‍सेस टोकन चोरले आणि यूजर अकाऊंट काही काळ कंट्रोल केला होता.