ऐकावं ते नवलंच! पण खरं आहे...'या' नदीच्या चिखलात सापडतं सोनं

तुम्ही एखाद्या नदीच्या काठावर गेलात आणि नदीच्या गाळात तुम्हाला सोनं सापडलं तर किती मजा येईल.

Updated: May 20, 2022, 02:34 PM IST
ऐकावं ते नवलंच! पण खरं आहे...'या' नदीच्या चिखलात सापडतं सोनं title=

मुंबईः सोन्याचे दागिने महिलांना खूप आवडतात. मात्र, सोन्याचे दर जास्त असल्याने लोक मर्यादेतच सोने खरेदी करतात. जरा कल्पना करा, तुम्ही एखाद्या नदीच्या काठावर गेलात आणि नदीच्या गाळात तुम्हाला सोनं सापडलं तर किती मजा येईल. हे वाचून तुम्हाला नक्कीच खूप आनंद होईल.

पण हे खरं आहे, थायलंडमधील नदीच्या चिखलातून सोनं सापडतं हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे लोक सकाळी येथे जाऊन पिशवीत सोने घेऊन येतात.

ही बातमी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना? पण हे अगदी खरं आहे. अहवालानुसार, दक्षिण थायलंडमध्ये एक नदी वाहते. मलेशियाशी जोडलेले हे क्षेत्र आहे. हा परिसर सोन्याचा डोंगर म्हणून ओळखला जातो. येथे दीर्घकाळापासून सोन्याचे उत्खनन सुरू आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लोक या नदीच्या काठावर तयार झालेल्या चिखलातून सोने गाळतात. मात्र, येथे फारसे सोने येत नाही. अगदी कमी प्रमाणात सोने काढण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागतात. एका दिवसाचा शोध घेतल्यावर लोकांना इतके सोने मिळते की ते एक दिवसाचा खर्च भागवू शकतात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातही एक अशी नदी आहे जिथून सोनं बाहेर येतं. ही नदी झारखंडमधील रत्नगर्भा येथून उगम पावते. जी सुवर्णरेखा नदीच्या नावाने प्रसिद्ध आहे.

ही नदी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात वाहते. स्वर्णरेखा आणि तिची उपनदी करकरीमध्ये सोन्याचे कण आढळतात. काही लोक म्हणतात की करकरी नदीतून वाहून गेल्यावरच सोन्याचे कण सुवर्णरेषेपर्यंत पोहोचतात.