सावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते

रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय. 

Updated: Dec 21, 2017, 11:54 PM IST
सावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते title=

मुंबई : रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय. 

रोबोट आणि ऑटोमेशनमुळे जगातील ८० करोड लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. म्हणजेच वैश्विक स्तरावर जवळपास २० टक्के नोकऱ्या धोक्यात आहेत. 

'मॅकेन्जी अॅन्ड कंपनी'च्या संशोधन विभागाच्या एका रिपोर्टमध्ये हा उल्लेख करण्यात आलाय. रोबोट आणि ऑटोमेशनमुळे केवळ भारतात जवळपास ११ करोडहून अधिक लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. 

तर चीनमध्ये यामुळे २० करोडहून अधिक लोक बेरोजगार होऊ शकतात. अमेरिकाही त्यापासून वेगळी राहू शकत नाही. इछथ जवळपास ५ करोड लोकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते.

'मॅकेन्जी ग्लोबल इन्स्टिट्युट'च्या एका अभ्यासात, येत्या १३ वर्षांत केवळ ऑटोमेशनमुळे जगभरात ४० करोड नोकऱ्या जाणार असल्याचं म्हटलं गेलंय. या अभ्यासासाठी ४६ देशांतील ८०० हून अधिक कामांना (jobs) सहभागी करण्यात आलंय. सावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते

मुंबई : रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय. 

रोबोट आणि ऑटोमेशनमुळे जगातील ८० करोड लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. म्हणजेच वैश्विक स्तरावर जवळपास २० टक्के नोकऱ्या धोक्यात आहेत. 

'मॅकेन्जी अॅन्ड कंपनी'च्या संशोधन विभागाच्या एका रिपोर्टमध्ये हा उल्लेख करण्यात आलाय. रोबोट आणि ऑटोमेशनमुळे केवळ भारतात जवळपास ११ करोडहून अधिक लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. 

तर चीनमध्ये यामुळे २० करोडहून अधिक लोक बेरोजगार होऊ शकतात. अमेरिकाही त्यापासून वेगळी राहू शकत नाही. इछथ जवळपास ५ करोड लोकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते.

'मॅकेन्जी ग्लोबल इन्स्टिट्युट'च्या एका अभ्यासात, येत्या १३ वर्षांत केवळ ऑटोमेशनमुळे जगभरात ४० करोड नोकऱ्या जाणार असल्याचं म्हटलं गेलंय. या अभ्यासासाठी ४६ देशांतील ८०० हून अधिक कामांना (jobs) सहभागी करण्यात आलंय.