Viral Video : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग...

Video Viral : वाघ, सिंह असो किंवा हत्ती यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात.  हत्ती हा अनेकांना आवडता प्राणी आहे. या हत्तीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले आहेत. माणसांचा मित्र म्हणून हत्तीची ओळख आहे. पण या हत्तीसोबत फोटो काढणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. 

Updated: Jan 25, 2023, 01:36 PM IST
Viral Video  : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग... title=
girl was taking pictures baby elephant Aggressive Attacked girl Shocking video viral on social media

Elephant Viral Video : हाथी मेरे साथी, हा बॉलिवूडमधील गाजलेला चित्रपट...हत्तीला आपण पूजतो, कारण हिंदू धर्मानुसार हत्ती म्हणजे गणरायाचं रुप...आज गणेश जयंती (Ganesh Jayanti 2023) ...अशात हत्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतो आहे. पण जर हा हत्ती पिसाळला तर तो सगळं नासधुस करुन सोडतो. कर्नाटकमधील कुर्गमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही हत्तीसोबत आंघोळ घालू शकता. पर्यटन वाढीसाठी अनेक ठिकाणी प्राणीसंग्रलयात हत्तींसोबत खेळायला आणि फोटो काढण्याची सोय केलेली असते. जेव्हा एक तरुणी हत्तीसोत फोटो काढण्यासाठी गेलं आणि मग...हा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking video) होतं आहे.  

धक्कादायक व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता 4 मोठे आणि 1 लहान हत्तीचा कळप आहे. या कळपासोबत एक तरुणी दिसतं आहे. या हत्तींच्या कळपासोबत तरुणीला फोटो काढायचा आहे पण थोड्या वेळात पुढे या व्हिडीओमध्ये जे पाहिला मिळते ते पाहून अंगावर शहारा येतो. या कळपातील बेबी हत्ती (baby elephant ) त्या तरुणीच्या मागेच लागतो. तिचे कपडेदेखील फाडतो. भयानक म्हणजे तिच्या अंगावर बसतो. कदाचित त्या हत्तीला ती तरुणी आवडली की काय तिच्यासोबत त्याला खेळायचं होतं. पण कळपासोबत फोटो काढणे मात्र या तरुणीच्या जीवावर बेतलं. (girl was taking pictures baby elephant Aggressive Attacked girl Shocking video viral on social media)

आईचा धाक!

प्रत्येक लहान मुलांना आईचा धाक असतो. तिच्या एका आवाजात लहान मुलं लगेचच चुकीचं कुठलं काम करत असेल तर थांबतं. बस मग काय या बेबी हत्तीची मस्ती पाहून आई हत्ती तिथे येते आणि मग काय बेबी हत्ती तिथून पळून जातो.  अशाप्रकारे तरुणीचा जीव वाचतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by yayadawn2010 (@yayadawn2010)

व्हिडीओ व्हायरल (Video Viral)

हा खतरनाक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर yayadawn2010 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  सोशल मीडियावर वाघ आणि सिंहासोबत खेळताना आणि त्यांना किस (man kissing lion) करताना अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. या व्हिडीओमधील व्यक्ती हे एक प्रशिक्षक असतात. म्हणून हे जंगली प्राणीदेखील त्यांना ओळखतात. पण कधी कधी या प्राण्याचं काही तरी बिनसतं आणि ते आक्रमक होतात. त्यामुळे कुठल्याही जंगली प्राण्यांपासून सर्वसामान्य लोकांनी चार हात लांबच राहिलेलं बरं...