चेहरा पाहून तुम्हालाही येईल किळस, तरीही पठ्ठ्याची Guinness World Record नोंद!

माणूस आहे की सैतान, अंगावर नकाशे अन् काय काय, तरीही त्याने केला World Record  

Updated: Nov 27, 2022, 05:57 PM IST
चेहरा पाहून तुम्हालाही येईल किळस, तरीही पठ्ठ्याची Guinness World Record नोंद! title=
Germany Rolf Buchholz Seeing the face will make you feel disgusted yet the Guinness World Record nz

Guinness World Record : या जगात प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते. स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. काहीजण त्यांच्या प्रयत्नांतून असाध्य गोष्ट देखील साध्य करुन दाखवतात. काहींना काहीतरी अनोखं करण्याची हौस असते, तर काहींना त्यांच्या छंदासाठी विचित्र गोष्टी करण्यापासून परावृत्त होत नाही. अशीच एक व्यक्ती जर्मनीत (Germany) राहते. त्याच्या नावावर जगातील सर्वाधिक शरीर बदलांसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंद केली आहे. शरीर सुधारणेमध्ये शरीर छेदन, गोंदणे किंवा इतर बदल यांचा समावेश होतो. राल्फ बुचोस असे या व्यक्तीचे नाव आहे. (Germany Rolf Buchholz Seeing the face will make you feel disgusted yet the Guinness World Record nz)

 
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार (Guinness World Record), रॉल्फ बुकोज (Rolf Buchholz) यांनी आतापर्यंत त्यांच्या शरीरात 516 बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) केले आहेत. हा त्याचा छंद आहे. रॉल्फच्या मते ते अजून संपलेले नाही. भविष्यातही तो आपल्या शरीरात असे बदल करत राहील. रॉल्फ बुचोज हे व्यवसायाने जर्मन टेलिकॉम कंपनीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात.

 

 

जेव्हा रॉल्फ बुकोझ 40 वर्षांचा होता तेव्हा त्याला बॉडी मॉडिफिकेशन करण्याची आवड होती. पण हळूहळू त्याची आवड निर्माण झाली मग त्याचा उत्साह आणि आत्मविश्वास (Confidence) वाढू लागला. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी पहिले टॅटू (Tattoos) आणि पिअर्सिंग (piercings) केले. आता त्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे. या 20 वर्षात त्याने आपल्या शरीरात ओठांवर टोचणे, भुवया आणि नाकावर टोचणे असे अनेक टॅटू बनवले. एवढेच नाही तर कपाळावर दोन शिंगांसारखा फुगवटाही त्यांनी बनवला आहे. त्याने बॉडी मॉडिफिकेशन स्वत:ची दखल घेण्यास जगाला भाग पाडले. 

 

रॉल्फ म्हणतो की तो बाहेरून बदलला असेल, पण आतून तो तसाच आहे. त्याच्या 510 शरीरातील बदलांपैकी 453 छेदन, टॅटू आणि आणखी काही आहेत. हे सर्व करून तो सर्वसामान्यांपेक्षा वेगळा दिसू लागला आहे. यामुळे एकदा त्याला दुबईच्या (Dubai) विमानतळावरच (Airport) थांबवण्यात आले. त्यांला घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. जेव्हा तो एका कार्यक्रमात गेला होता तेव्हा तिथे जाण्याची परवानगी मिळाली नाही. आता त्याचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सोशल मीडियावर शेअर केला आहे.