Viral : Live अँकरिंग सुरु असताना मागून आली भरधाव कार, पण... पाहा व्हिडीओ

या व्हिडिओमध्ये दोन अँकर बसून अँकरिंग करताना दिसत आहेत. परंतु त्या दरम्यान असं काही घडतं की, अचानक दोघेही घाबरतात.

Updated: Jul 11, 2022, 10:27 PM IST
Viral : Live अँकरिंग सुरु असताना मागून आली भरधाव कार, पण... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात. यातील काही गोष्टी अशा असतात की, ज्यांना पुन्हा-पुन्हा बघूनही आपल्याला हसू आवरता येत नाही. असाच एका व्हिडीओला सोशळ मीडियावर ट्रेंड होत आहे. ज्याला खूप व्ह्यूज आणि लाईक देखील मिळत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओचे कॅप्शनही खूप मजेदार देण्यात आले आहे.

या व्हिडिओमध्ये दोन अँकर बसून अँकरिंग करताना दिसत आहेत. मग असे काही घडते की, अचानक दोघेही घाबरतात आणि आपापल्या जागेवरून उठतात आणि पळायला लागतात. शेवटी, अँकर इतके का घाबरले हे जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम हा व्हायरल व्हिडीओ पाहा...

तुम्हाला या व्हिडीओमध्ये अँकरच्या मागे एक स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर एक कार अँकरच्या दिशेने येताना दिसते. ज्यामुळे हे अँकर घाबरले. परंतु तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, त्यांच्या मागे फक्त स्क्रिन लावली आहे. ज्याला घाबरुन हे दोन्ही अँकर जागेवरुन उठुन उभे राहिले.

हा व्हिडिओ पाहून लोकं अँकरची भरपुर खिल्ली उडवत आहेत. आत्तापर्यंत 6.3 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याला लाखो लोकांनी लाईक देखील केले आहे.