मोठा निर्णय! 5वीच्या पुढील शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत condom वाटप

 शाळांमध्ये इयत्ता 5 वीपासून पुढील विद्यार्थ्यांना मोफत कंडोम वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Updated: Jul 11, 2021, 11:13 AM IST
 मोठा निर्णय! 5वीच्या पुढील शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत condom वाटप  title=

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये बहुतांश शाळा बंद आहेत. मात्र, अमेरिकेत काही प्रमाणात शाळा सुरू कऱण्यात आल्या आहेत. दरम्यान शाळा सुरू झाल्यानंतर अमेरिकेतील शिकागो प्रशासनाने लैंगिक शिक्षणाचा भाग एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाप्रमाणे शाळांमध्ये इयत्ता 5 वीपासून पुढील विद्यार्थ्यांना मोफत कंडोम वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

शाळकरी मुलांमध्ये वाढते लैंगिक आजार आणि असुरक्षित गर्भधारणा यावर उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. शिकागो प्रशासनाकडून शाळेतील 10 वर्षांवरील विद्यार्थ्यांना मोफत कंडोम वाटप करण्यास सांगण्यात आलं आहे. शिकागोच्या पब्लिक स्कूल बोर्ड ऑफ एज्युकेशनने हा निर्णय घेतलाय. या शिक्षण मंडळाने डिसेंबर 2020 मध्येच नवं शिक्षण धोरण निश्चित केलं होतं. मात्र, कोरोनामुळे याची अंमलबजावणी जुलै 2021 मध्ये करण्यात आली.

दरम्यान हे नवीन नियम जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा रोष वाढलेला दिसतोय. लोक या धोरणावर प्रश्न उपस्थित केले जातायत. मुलांचे पालक यास लज्जास्पद म्हणत आहेत. अमेरिकेतील संशोधन संस्थांनी केलेल्या रिसर्चमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये देखील लैंगिक आजारांचं प्रमाण आणि असुरक्षित गर्भधारणा होत असल्याचं समोर आलं होतं.

या अहवालाची गंभीर दखल घेत तातडीने शिक्षण धोरणात उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार मुलांमध्ये लैंगिक आजारांचा संसर्ग होऊ नये, एचआयव्ही सारख्या गंभीर आजाराचा धोका होऊ नये आणि कमी वयात असुरक्षित गर्भधारणा होऊ नये म्हणून उपाययोजना करत विद्यार्थ्यांमध्ये कंडोम वाटपचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावरून टीका

तर एकीकडे या निर्णयाचं कौतूक होतं असून टीकाही केल्या जात आहेत. सोशल मीडियावर अनेक लोक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतायत. अमेरिकेतच नाही तर या निर्णयावर जगातील इतर देशांमध्ये देखील चर्चा सुरू आहे.