Bangladesh Explosion: बांगलादेशमध्ये भीषण स्फोट; 14 ठार, 100 हून अधिक जखमी

Bangladesh Explosion: बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाकामध्ये (Dhaka) भीषण स्फोट (Explosion) झाला आहे. एका व्यावसायिक इमारतीत हा स्फोट झाला असून 14 ठार तर 100 हून अधिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.   

Updated: Mar 7, 2023, 07:11 PM IST
Bangladesh Explosion: बांगलादेशमध्ये भीषण स्फोट; 14 ठार, 100 हून अधिक जखमी title=

Bangladesh Explosion: बांगलादेशमध्ये (Bangladesh) एका बहुमजली इमारतीत भीषण स्फोट (Explosion) झाला आहे. या स्फोटात 14 जण ठार झाले असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. राजधानी ढाकामधील (Dhaka) गुलिस्तान (Gulistan) परिसरात हा स्फोट झाला आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. 

स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रहदारी असणाऱ्या सिद्दिकी बाजारमध्ये ही इमारत आहे. या इमारतीत अनेक कार्यालयं आणि दुकानं आहेत. सात माळ्यांची ही इमारत असून तळमजल्यातील एका दुकानात हा स्फोट झाला आहे. या दुकानात सॅनिटेशनचं सामान विकलं जात होतं.