लैंगिक शोषणाच्या आरोपांवर काय म्हणाले Elon Musk? नेमकं काय प्रकरण पाहा

Elon Musk वर लैंगिक शोषण? तोंड बंद ठेवण्यासाठी एअर हॉस्टेसला इतक्या कोटींची ऑफर? ऐकून धक्काच बसेल  

Updated: May 20, 2022, 04:16 PM IST
लैंगिक शोषणाच्या आरोपांवर काय म्हणाले Elon Musk? नेमकं काय प्रकरण पाहा  title=

मुंबई : जागतील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप साधासुधा नाही तर आधी लैंगिक शोषणाचा आणि त्यानंतर तोंड बंद ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

एअर हॉस्टेस महिलेनं एलन मस्क यांच्यावर हे गंभीर आरोप केले. या एअर हॉस्टेसनं केलेल्या दाव्यानुसार एलन मस्क यांनी 2016 मध्ये वाईट कृत्य केलं. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी 2.5 लाख डॉलर्सची ऑफर दिली.

2016 रोजी विमान प्रवासा दरम्यान एअर हॉस्टेसच्या सहमतीशिवाय एलन मस्क यांनी प्रायवेट पार्ट दाखवल्याचा आरोप केला. याशिवाय त्यांनी अश्लील मेसेज केल्याचाही दावा या एअर हॉस्टेसनं केला. तिने केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

ही एअर हॉस्टेस एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्समध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करत होती. तिने एलन यांच्यावर आरोप केला. एअर हॉस्टेसने स्वत: सही करून हे सगळं खरं असल्याचं सांगितलं होतं. 

या एअर हॉस्टेसला मसाज लायसन्स घेण्याबाबतही सांगण्यात आलं. हे लायसन्स असेल तर ती एलन मस्कला मसाज देऊ शकते असंही त्यावेळी सांगण्यात आलं. या प्रकरणी तिने तक्रार केली आणि सगळा प्रकार स्पेसएक्सला सांगितला. 

2018 मध्ये सेटलमेंट करण्यासाठी या एअर हॉस्टेसला 2.5 लाख डॉलर्स देण्याची ऑफर दिली. त्याबदल्यात तिला तोंड बंद ठेवण्याबाबतही सांगण्यात आलं. या प्रकरणी एलन मस्कने नंतर मौन सोडलं आणि हे सगळं राजकारण असल्याचा दावा केला. मी जर या प्रकरणात समाविष्ट असतो तर माझं 30 वर्षांचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं असंही बोलताना मस्क म्हणाला.