पॉर्न स्टारसोबतच्या संबंधांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नकार

ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची बाब आता समोर आली आहे.अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने हे वृत्त प्रकाशित केलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 13, 2018, 11:35 PM IST
पॉर्न स्टारसोबतच्या संबंधांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नकार title=

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, एका वेगळ्या वादात अडकले आहेत. ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची बाब आता समोर आली आहे.अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने हे वृत्त प्रकाशित केलं आहे. मात्र आपले या पॉर्न स्टार सोबत संबंध आले नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

तोडं बंद ठेवण्यासाठी पॉर्न स्टारला लाखो रूपये

हे अमेरिकेच्या जनतेसमोर येऊ नये, यासाठी पॉर्न स्टारला लाखो रुपये देण्यात आले, अशी बातमी झळकल्यानंतर, डोनाल़् ट्रम्प वादात आले आहेत.

एका गोल्फ सामन्याच्या वेळी भेट

'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, 2006 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि स्टेफनी क्लिफोर्ड यांची एका गोल्फ सामन्याच्या वेळी भेट झाली होती. यानंतर दोघे कथितरित्या रिलेशनशिपमध्ये होते.

स्टॉर्मी डॅनियल्स नावाने ती अडल्ड सिनेमे करते.  महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रॅम्प यांचं लग्न वर्षभरापूर्वीच झालं होतं.

ट्रम्फ यांच्यासमोरील अडचण वाढू शकते

याची वाच्यता माध्यमांमध्ये किंवा कुठेही करू नये म्हणून, क्लिफोर्डला सुमारे 82.69 लाख रुपये देण्यात आले होते. खरंतर अध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेक महिलांनी असे आरोप केले आहेत. आता पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याच्या वृत्ताने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.