ट्रम्प यांनी मुलगी इवांकावर ब्रेस्ट इम्प्लांटसाठी दबाव टाकला?

ती प्रत्येक वर्षी फोटोशूटही करत होती. यावर दरवर्षी जवळपास ४४,००० डॉलर खर्च करत होती. 

Updated: Jun 21, 2018, 11:35 AM IST
ट्रम्प यांनी मुलगी इवांकावर ब्रेस्ट इम्प्लांटसाठी दबाव टाकला? title=

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली मुलगी इवांका ट्रम्प हिच्यावर ब्रेस्ट इम्प्लांटसाठी दबाव टाकला होता, असा धक्कादायक खुलासा एका पत्रकारानं एका पुस्तकाच्या माध्यमातून केलाय. 'वॅनिटी फेअर'च्या सीनिअर रिपोर्टर एमिली जेन फॉक्स यांनी आपलं पुस्तक 'बॉर्न ट्रम्प : इनसाईड अमेरिकाज फर्स्ट फॅमिली'मध्ये याचा खुलासा केलाय. 

एमिली यांच्या म्हणण्यानुसार, इवांकाला कॉलेजमध्ये असल्यापासूनच मॉडेल बनायचं होतं. यासाठी ती प्रत्येक वर्षी फोटोशूटही करत होती. यावर दरवर्षी जवळपास ४४,००० डॉलर खर्च करत होती. 

'बॉर्न ट्रम्प : इनसाईड अमेरिकाज फर्स्ट फॅमिली' या पुस्तकात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अनेक खुलासे करण्यात आलेत. एमिलीच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प इवांकाला मॉडेलिंगसाठी खूपच प्रोत्साहीत करत होते. इवांका आणखीन आकर्षक दिसावी यासाठी ट्रम्प यांनी तिला ब्रेस्ट इम्प्लांटचा सल्लाही दिला होता. इतकंच नव्हे तर यासाठी त्यांनी तिच्यावर दबावही टाकला होता. परंतु, त्यांची बहिण मेरियानच्या हस्तक्षेपामुळे हे शक्य होऊ शकलं नाही. 

एमिलीच्या दाव्यानुसार, 'The Howard Stern Show' या कार्यक्रमात अँकरनं डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या मुलीबद्दल काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी, 'इवांका कामुक दिसते... तिनं ब्रेस्ट इम्प्लांट केले असते तर ती आणखीन आकर्षक दिसली असती' असंही म्हटलं होतं.